<
कासोदा/एरंडोल(प्रतिनिधी)- येथील प्रकाशदायी संस्थेतर्फे ३३ पुरस्कारार्थीना मौलाना आझाद लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी म्हटले. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील ३३ पुरस्कारार्थीना मौलाना आझाद लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकिजा पटेल, जि.प. माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, विवेक ठाकरे, शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुंझरकर, प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव, फारुख शहा नौमानी, हाजी तय्यब अली सलाउद्दीन, अलाउद्दीन शेख, अफसर अली, हैदर अली, संदीप वाघ, आनंदा मिस्त्री, अब्दुल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोगतात बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव प्रेरणादायी बाब आहे. समाजातील सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे माझ्यामध्ये समाज या शब्दाची व्याख्या म्हणजे हिंदू किंवा मुस्लिम नसून किंवा मराठा, तेली, माळी असा नसून भारत देशाच्या विकासासाठी चांगुलपणावर श्रद्धा ठेवून हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून जीवन जगणारा व्यक्ती समूह म्हणजे समाज असे माझे स्पष्ट मत आहे. हा समाज बलशाली सुदृढ करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित समन्वयाने काम करण्याची नितांत गरज असून संयोजकांनी समाजव्यवस्थेला बळकट करणारा चांगला कार्यक्रम घडवून आणला याचा सार्थ अभिमान असल्याचे असल्याचे प्रतिपादन किशोर पाटील कुंझरकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की संस्थेचे अध्यक्ष मोइन शेख व संयोजक नूरुद्दीन मुल्लाजी व त्यांच्या संस्थाने मानवतेचे काम केले असून अनेक क्षेत्रातील लोकांना त्यांनी गौरव केला आहे. मौलाना आझाद यांचे प्रेरणादायी काम डोळ्यासमोर ठेवून पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती काम करण्याचे आव्हान केले. सूत्रसंचालन संयोजक नूरुद्दीन मुल्लाजी तर आभार आरिफ पेंटर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.