<
जळगाव- (भाग-२) येथील सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाच्या अधिनस्त असलेले 3 तत्कालीन अधिकाऱ्यांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत सविस्तर असे की जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक सपकाळे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या कार्यालयाकडे त्या तीन अधिकाऱ्यांची माहिती मागितली होती परंतू तब्बल एका वर्षा नंतर माहीती उपलब्ध करून दिली. यामध्ये (१)रविंद्र राजाराम सोनवणे (२) सुरेभान रामराव पाटील (३)हेमलता मोहोड या तीन अधिकाऱ्यांनी नोकरीत असताना नियमित शिक्षण घेऊन शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. यानंतर माहिती अधिकार प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ता दीपक सपकाळे यांनी समाज कल्याण विभागाचे पुणे आयुक्तालय कार्यालयांमध्ये दिनांक ३/४/२०१८ रोजी तक्रार दाखल केली आहे. परंतु सदर तक्रारीची दखल घेत नसल्याने तक्रारदाराने आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर आयुक्त कार्यालयाने संबंधित (१)रविंद्र राजाराम सोनवणे (२) सुरेभान रामराव पाटील (३)हेमलता मोहोड या तीन अधिकाऱ्यांना दिनांक १४/ ५/२०१९ रोजी पण घेऊन ८ दिवसांमध्ये खुलासा सादर करण्याचे पत्र दिले होते. त्यानंतर तब्बल दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही, यामुळे आयुक्तालयाच्या कारभारावर ती संशय निर्माण होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त पुढील भागात सत्यमेव जयते वर वाचा.