<
जळगाव (हर्षल सोनार) – जळगाव शहर महानगर पालिकेच्या निवडणुका गेल्यावर्षी झाल्या त्यात जळगावकरांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली.भाजपाच्या नेत्यांनीही जळगावचे एकवर्षाच्या आत कायापलट होईल.अशी फसवी आश्वासने दिलीत आजच्या घडीला जळगाव मनपा निवडणुकीला एक वर्ष पुर्ण होऊन देखील जळगाव आहे त्याच स्थितित आहे.
जळगाव मधील रस्ते, भुमिगत गटारी, sewage line,सगळीकडे घाणीचे साम्राज्य, भकास पडलेली MIDC (मागील ५ वर्षात एकही नविन उद्योग नाही) त्यामुळे वाढती बेरोजगारी शहरातील मार्केट चा गाळा प्रश्न, हुडकोचे कर्ज,कर्जात बुडालेली मनपा, विमानतळ प्रश्न , शिवाजीनगर पुलाचे अतीसंथ गतीने होणारे काम, त्यात पिंप्राळा पुलाचा मुहुर्त केव्हा लागेल देवालाच माहीत, अमृत योजनेचे संथ कामं, शहरातील महामार्गाचे चौपद्रीकरण व समांतर नसलेले रस्ते अजुन किती जणांचे बळी घेतल्यावर होणार कोणाला माहीत.
नगरसेवक तर वार्डात ढुंकुनही बघत नाही.आणि त्यांच्या जवळ जर वार्डा संबधी काही प्रश्न मांडले तर त्यांचे एकच उत्तर तयार असत महानगरपालिकेकडे निधी नाही.मग यांना ही मनपाची स्थिती निवडणुकी पुर्वी माहीत नव्हती का?
मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी,आणि शहरांचा सर्वागीण विकास करण्यासाठीच तर जळगावकरांनी आपल्याला एकहाती सत्ता दिलीय. प्रत्येक वेळेस मोदी लाटेवर निवडुन येणार का स्वत:चे कर्तुत्व तर दाखवा.
जळगाव मनपावर जर कोणाचेही सरकार आल्यावर देखील हीच परिस्थिती राहत असेल तर निवडणुका घेवुन करोडो रूपये खर्च करण्यापेक्षा पक्षाच्या चिठ्या टाकुन अल्टी पाल्टीने सत्ता उपभोगा ना.. कश्याला पाहीजे हा एवढा लोकशाहीचा देखावा….