<
जळगाव : विद्यार्थ्यांचे परीक्षा काळातील मानसिक दडपण कमी व्हावे त्यांना हसत खेळत परीक्षा देता यावी त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. या उद्देशाने एसडी सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या वतीने सिद्धिविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे प्रा. एस. व्ही. सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली “परीक्षेला सामोरे जातांना” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दहावी, बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. मुले वर्षभर अभ्यास करत नाही. ऐन परीक्षा तोंडावर आली कि, त्यांना अभ्यास सुचतो. काही विद्यार्थ्यांना या परीक्षेचे गांभीर्य नसते. त्यामुळे परीक्षा सुरु असतांना अनेक विद्यार्थ्यांवर दडपण दिसते. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी शिल्लक वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करावा. विषय नीट समजून घ्यावा. मानसिक दडपण न घेता यशस्वी परीक्षेला जमोरे जावे.
दहावी बारावीच्या परीक्षेसाठी आता कमी दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वेळापत्रक तयार करून अभ्यासाला लागले पाहिजे. आपल्याला परीक्षा द्यायची आहे, हे अगोदरच आपल्या मनात बिंबविले पाहिजे. त्यामागे आपले काही तरी दुरेचे ध्येय असले पाहिजे. जसे आयुष्याचे नियोजन, काहीतरी चांगली नौकरी मिळविणे, व्यवसाय करणे, नवनवीन माहिती मिळविणे, नैतिक आचरण मुल्यांची जाणीव ठेवणे इत्यादी. आपल्याला ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील व आजच अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. अभ्यासाकळे केवळ शालेय परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने न पाहता अभ्यास हि ज्ञान मिळविण्याचे निरंतर प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. कारण अभ्यासाकळे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्यामुळे अभ्यासाची पद्धत बदलते आणि भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो.
प्रा. सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्यात
१- दररोज अभ्यासाची वेळ निश्चित करा.
२- अभ्यासाचे वेळापत्रक बनवा.
3- अभ्यास करतांना झोपून अभ्यास करू नका.
4- महत्वाचे मुद्दे काढण्यासाठी वही व पेन्सिल जवळ ठेवा.
5- अभ्यासाला योग्य पद्धतीने बसा
7- परीक्षेच्या आधी व परीक्षेच्या काळात पुरेसा आहार घ्या.
8- स्व अध्ययनावर भर द्या.
9- स्वताच्या मेहनतीवर अभ्यासावर विश्वास ठेवा आणि अभ्यास करा.
10- आपले लेखन कौशल्य विकसित करा.
या प्रसंगी प्राचार्य श्री. खोपडे सर आणि एसडी-सीड समन्वयक प्रवीण सोनवणे आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सोनवणे तर सूत्रसंचालन प्रा पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य खोडपे व विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.