<
जळगाव-(प्रतिनिधी,दि. ७)-जिल्ह्यातील युवक युवतींसाठी युवा नेतृत्व समुदाय संघटन कार्यक्रम अंतगत तीन दिवसाचे प्रशिक्षण नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून घेण्यात आले. या प्रशिक्षण दिनांक 5, 6 आणि 7 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे सुरू झाले या प्रशिक्षणासाठी नेहरू युवा केंद्राचे श्री नरेंद्रजी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील कृषी भूषण सागर धनाडजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ , सुनील वाणी, प्राचार्य डॉ विशवनाथ महाजन , दिनेश पाटील, नितीन नेरकर, जितेंद्र सोनवणे, पितांबर भावसार, शिरीष तायडे, चंद्रकांत इंगळे संदीप तांदळे, सुभाष सोनवणे, आदींची या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती मिळाली या प्रशिक्षणात नेतृत्व विकास, कौशल विकास, पाणलोट विकास, रोजगार निर्मिती, शासकीय योजना, नेहरू युवा केंद्र पार्श्वभूमी, बेटी बचाव, संसद पडोस विकास कार्यक्रम, उद्योग व्यवसाय, वृक्ष ,पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयावर युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे तसेच एकदिवशीय क्षेत्र कार्य भेट प्रधान मंत्री कौशल्य विकास केंद्र दिली याठिकाणी प्रशिक्षक सागर धनाड, सुनील वाणी, भूषण लाडवंजारी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक नरेंद्र डांगर, अजिंक्य गवळी, विनोद पाटील, दिनेश पाटील आदी प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात अमळनेर येथी गडखाब गावातील नितीन नेरकर यांचे नेहरू युवा मंडळ याना सण 2018 चा बेस्ट युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले तसेच हा यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि तुळजाई संस्थचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी आदी परिश्रम घेत आहे.