Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अभाविपतर्फे एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अभाविपतर्फे एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी)-येथील एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे देणारे मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून एसएसबीटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय शेखावत , स्वागगत समिती सदस्य यामिनी कुलकर्णी, नगरमंत्री आदेश पाटील, प्रा. अर्चना भावसार, कबचौनगर अभियान संयोजिका श्रुष्टी अहिरराव कार्यक्रम प्रमुख क्रांती पाटील, प्रशिक्षक श्री प्रवीण राव सर उपस्थित होते.

यावेळी प्रा. संजय शेखावत सरांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी स्व संरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत जेणेकरून स्वतःचा बचाव त्या स्वतः करू शकतील असे प्रतिपादन देखील प्रा.संजय शेखावत यांनी केले. यावेळी त्यांनी अभाविपचे अभिनंदन देखील केले की मिशन साहसी अभियान राबवून ते विद्यार्थिनींना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही चांगली बाब आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यामिनी कुलकर्णी देखील उपस्थित होत्या. त्यांनी स्व संरक्षणाचे महत्व उपस्थित विद्यार्थिनींना विषद केले. तसेच स्व संरक्षित होण्यासाठी  सदैव उत्साहित व आत्मविश्वास बाळगून राहणे खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. क्रांती पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचे महत्व उपस्थितांना सांगितले. आदेश पाटील यांनी अभाविप परिचय करून दिला. तसेच मिशन साहसी अभियान काय आहे?, त्याचा उद्देश सृष्टी अहिरराव यांनी उपस्थित विद्यार्थिनींना सांगितला. सायली पाटील यांनी सुटसंचालन केले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हा संयोजक मनोज पाटील, मिशन साहसी महानगर संयोजिका रिद्धी वाडीकर, चेतन भैरव, तुषार पाटील, संजीवनी सवई, आदिनाथ सूर्यवंशी, ऐश्वर्या पाटील, शुभांगिनी पाटील, वैष्णीवी नेरकर, साक्षी पाटील, श्रद्धा सोनार, सारिका शेळके, तृप्ती सूर्यवंशी, हृचिता राजूरकर, अर्पिता देसले, हेमांगी सराटे, हर्षदा दिगराळे, सेजल गुजर, कृनिका जाधव, अनुप पाटील, संकेत सोनवणे, हर्षल देवरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावात रंगली बहुभाषिक काव्य मैफल! अमृतधारा फाऊंडेशनतर्फे आयोजन

Next Post

नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून तीन दिवशीय प्रशिक्षण समारोप

Next Post

नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून तीन दिवशीय प्रशिक्षण समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo