<
जळगाव.दि.07- जागतीक सुर्यनमस्कार दिनानिमित्ताने 07 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे शहरातील नागरिकांनी उपस्थिती देवून सुर्यनमस्कार दिन मोठ्या उत्सवात साजरा केला. याप्रसंगी केशव स्मृती सेवासंस्था समुह जळगाव चे अध्यक्ष भरत अमळकर यांनी आरोग्यासाठी सुर्यनमस्कार करणे कसे आवश्यक आहे. हे उपस्थितांना आणि विशेष करून विद्यार्थ्यांनासांगताना सुर्यनमस्कार हा योगा सर्व योगांमधे उपयुक्त आहे. सुर्यनमस्कारामुळे शरीराबरोबरच मनही निरोगी राहाते. तसेच सुसंस्कृत देखील होते. सुर्यनमस्कार दररोज घातल्याने आपले शरीर निरोगी व स्वस्थ होवून तेजस्वी बनते.
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगता व्यायामासाठी सुर्यनमस्कार हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा परिषद बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक सुर्यनमस्काराचा एकत्रित कार्यक्रम 07 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी ७.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील होते.
यावेळी सर्व विदयार्थ्यानी मंत्रोच्चारासह सुर्याची आराधना करुन दहा सुर्यनमस्कार घातले. जागतिक सुर्यनमस्काराचा एकत्रित कार्यक्रमात जळगाव शहरातील 45 शाळांमधून 6500 विदयार्थ्यी व 150 शिक्षकांनी सहभाग नोंदवून एकत्रित मंत्रोच्चारासह सुर्यनमस्कार घातले. मंत्रोच्चराची व सुर्यनमस्कार करवून घेण्याची जबाबदारी श्रीमती रेवती ठीपसे व श्री. प्रशांत जगताप ला. ना. विदयालयातील क्रीडा शिक्षिकी श्रीमती रेवती ठीपसे आणि शिक्षक प्रशांत जगताप यानी पार पाडली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्ती,संस्था चालक, योगा शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरातील क्रीडा शिक्षक, जिल्हा क्रीडा कार्यालयातील तसेच संकुलाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.