<
जळगाव.दि.07-राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य (आत्मा) योजनेंतर्गत 11 फेब्रुवारी 2020 रोजी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता बोर कॅन्डी,पेरू जेली,टोमॅटो कॅचप इत्यादि उत्पादने तयार करणेसाठी फळक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र ,ममुराबाद जिल्हा जळगाव येथे सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी प्रति शेतकरी 25 रुपये याप्रमाणे नोंदणी फी आकारली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी 11 फेब्रुवारी रोजी ममुराबाद येथे आयोजित फळप्रक्रिया प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक,आत्मा,जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका पसिघ्दी पत्रकान्वये केले आहे.