<
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याबाबत अ.भा. शाहीर परिषदेचे निवेदन
जळगाव-(प्रतिनीधी)- महाराष्ट्रातील सांस्कृतिक लोककला जोपासणाऱ्या या तमाशा फडावर व कलावंतांवर सातत्यान गावपातळीवर गावगुंडांकडुन होणारे हल्ले महिला कलावंतांचा विनयभंग अशा अनेक घटना महाराष्ट्रामधे घडत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व आपली तमाशा कला लावणी नृत्य कला अशा महाराष्ट्राच्या अस्सल पारंपारिक लोककलेचे जतन संवर्धन करणाऱ्या लोककलावंतांवर होणारे हल्ले गावगुंडांकडुन होणारा त्रास हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय घटना राज्यामधे घडत आहे. ४ फेब्रुवारी रोजी र्इगतपुरी तालुक्यातील साकुर या गावात सदोबा यात्रेनिमित्त कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा तमाशाचा फड लावण्यात आला होता. तमाशा फडाचा कार्यक्रम शासन नियमाच्या वेळेत संपवुन कलावंत जेवण करायला तंबुत गेले परतले असता व काही कलावंत कार्यक्रमाची आवरा आवर करत असतांना गावातील काही गावगुंड तमाशा फडाच्या तंबुत शिरले व कलावंतांवर प्राणघातक हल्ले केले. तसेच महिला कलावंतांचा विनयभंग करून अश्लिल भाषेत शिविगाळ करून कार्यक्रम सुरू करण्याबाबत आग्रह धरला. महाराष्ट्राची सांस्कृतिक अभिरूध्दी जोपासणाऱ्या तमाशा कलावंतासह अनेक लोककलावंतांवर होणारे हल्ले, अत्याचार पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय बाब आहे. असे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, जळगांव व खान्देश तमाशा परिषद, जळगांव यांच्या वतीन या निवेदनाव्दारे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की महाराष्ट्रात होणाऱ्या तमाशा कलावंतांवर होणाऱ्या हल्ल्याची दखल घेवुन आरोपींना कठोर शासन व्हावे तसेच यात्रेच्या निमित्तान तसेच विविध ऊत्सवाच्या निमित्तान होणाऱ्या तमाशा कलावंतांना संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.