<
जळगाव(प्रतिनिधी)- सम्यक प्रबोधन मंच शाखा जळगांव तर्फे मुकनायक शताब्दी वर्षानिमित्त व राष्ट्रमाता रमाई जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब मुकनायक पुरस्कार वितरणाचे आज आयोजन शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४वाजता पत्रकार भवन, तहसील कार्यालयाजवळ करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अनिल पाटील(जेष्ठ पत्रकार देशदुत) हे भुषविणार आहे. प्रमुख अतिथी तथा वक्ते म्हणून प्रा.डाँ. अनिल डोंगरे(कबचौ उमवी जळगांव), मा. मिलींद कुलकर्णी(लोकमत), मा. त्र्यंबक कापडे(दिव्य मराठी), मा.दिनेश दगडकर(तरुण भारत), मा. अशोक भाटीया(जेष्ठ पत्रकार), मा. दिलीप शिरुडे(अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ जळगांव), प्रा. सरोज लभाणे, आयु. जोत्सना सोनवणे(आँडीटर), प्रा. सुनंदा वाघमारे, ममता सपकाळे, प्रा. पंचशील सपकाळे हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर प्रसंगी पत्रकार, छायाचित्रकार व वृत्तपत्र विक्रेते सर्वस्वी कैलास शिंदे(सकाळ), प्रविण ए. सपकाळे(संपादक दै. नजरकैद), चुडामण बोरसे(लोकमत), संतोष ढिवरे(साईमत), भारत ससाणे(सिटी मिरर), लालचंद अहिरे(देशदुत), हेमंत पाटील(बातमीदार), राजेश यावलकर(लोकशाही), प्रकाश बारी(संपादक नागवेल), भुषण हंसकर(देशोन्नती), नितीन सोनवणे(पुण्यनगरी), संजय पाटील, संजय जुमनाके(चँनेल), आबा मकासरे(दिव्य मराठी), विकास पोतदार(वृत्तपत्र विक्रेता), धन्यकुमार जैन(जनशक्ती) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. असे आवाहन आयु. वसंत सपकाळे, प्रा. यशवंत मोरे, बळवंत भालेराव, विश्वासराव बिर्हाडे, भगवान नन्नवरे, दिलीप सपकाळे, दिलीप इंगळे, सुनील दाभाडे, साहेबराव बागुल, प्रा. सुहास बागुल, जगदीश सपकाळे, अतुल सोनवणे आदींनी केले आहे.