Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आपल्या लेखणीतून मराठी गाण्यांना अजरामर करणारे रससंपन्न भावकवी सुधीर मोघे यांची 8 फेब्रुवारी जयंती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in राष्ट्रीय, लेख, विशेष
Reading Time: 1 min read

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही, मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा, टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे, सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला, आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन, किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या, आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल-विफलतेला, खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात, एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी, एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं, आयुष्यात प्रेम यावं लागतं….

आपल्या लेखणीतून मराठी गाण्यांना अजरामर करणारे रससंपन्न भावकवी सुधीर मोघे यांची 8 फेब्रुवारी जयंती. गीतकार म्हणून मोघे यांची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. फिटे अंधाराचे जाळे, आला आला वारा, एकाच या जन्मी जणू, विसरू नका श्रीरामा मला, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, यासारखी अवीट गोडी असणारी गीते मोघे यांनी लिहिली. लोकांना भावणारी गीते मोघे यांनी लिहिली. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे ते बंधू होत. मूळचे कवी असलेल्या सुधीर मोघे यांनी गीत लेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन अशा अनेक प्रांतात आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय, अशा 50हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केले.सांज ये गोकुळी, फिटे अंधाराचे जाळे, दिसलिस तू, फुलले ऋतु, आदिमाया अंबाबाई, मन मनास उमगत नाही, मना तुझे मनोगत, झुलतो बाई रास-झुला, दयाघना, एकाच या जन्मी जणू…’ अशी त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

शांता शेळके, सुधीर फडके यांच्यासोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. कविता-गीतलेखनाचं काम करत असतानाचा त्यांनी काही मालिका, सिनेमांनाही संगीतकार म्हणून साज चढवला. कशासाठी प्रेमासाठी या सिनेमाला त्यांनी संगीत दिलं होतं तर झी मराठीवर गाजलेला नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाची एक वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी या कार्यक्रमाचं सादरीकरणही तितक्याच दिमाखदारपणे केलं होतं. मंतरलेल्या चैत्रबनात’ असो किंवास्मरणयात्रा` असे नेहमीच वेगळे प्रयोग करण्यात त्यांचा हातखंडा होता. साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चारवेळा पटकावला होता. अखेरच्या काळात सुधीर मोघे यांनी भावसंगीताचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले होते. तसेच ‘सती’ नाटकावर आधारित ‘विमुक्ता’ हा चित्रपट सुरू करण्याच्या तयारीत होते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची भूमिका असलेल्या ‘रमा-माधव’ या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली असून काही प्रसंगांसाठी संवादलेखन केले आहे.

मोघे यांना मिळालेले पुरस्कार – राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार (चारवेळा), गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, मराठी कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके पुरस्कार, दांडेकर कुटुबिंयांचा गो. नि. दांडेकर स्मृती पुरस्कार, दामले कुटुंबीयांचा केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार, सोमण परिवाराचा स्वरशब्दप्रभू अजित सोमण पुरस्कार..

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ”मूकनायक” पुरस्कार वितरण समारंभाचे आज आयोजन

Next Post

गझलसम्राट जगजित सिंह यांची 8 फेब्रुवारी जयंती

Next Post

गझलसम्राट जगजित सिंह यांची 8 फेब्रुवारी जयंती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo