<
जळगाव दि. १० - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात डायलेसीस सेंटर अंतर्गत डायलेसीसची प्रक्रिया आता अधिक अत्याधुनिक झाली आहे. या विभागात अत्याधुनिक स्वरूपाचे डायलेसीस मशिनचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, लेखापाल रमाकांत पाटील, डायलिसीस विभागाचे रवी बोरसे, अशोक बर्हाटे, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात किडनी विकार असलेल्या रूग्णांसाठी डायलेसीस सेंटर स्वतंत्ररित्या कार्यरत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत डायलेसिस सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विभागात आता फिजीनेस ४००८ (एस) ही रक्ताचे अधिक अचुक पध्दतीने शुध्दीकरण करणारी मशिन उपलब्ध झाली आहे. या मशिनद्वारे रक्त शरीराच्या बाहेर काढुन स्वच्छ केले जाते. ज्या व्यक्तींना दिर्घकालीन हेमो डायलिसीसची आवश्यकता असते त्यांना हेमोडायलीसीस यंत्राचा आठवड्यातुन चार तास तीन वेळा उपयोग करावा लागतो. जळगाव जिल्ह्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात फिजीनेस या कंपनीची मशिन उपलब्ध झाल्याने रूग्णांना अधिक चांगल्या दर्जाची सुविधा मिळत आहे. आज सकाळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी या मशिनचे लोकार्पण केले. दररोज सकाळी ८ ते ११ यावेळेत डायलीसीसची प्रक्रिया होत असुन गरजू रूग्णांनी अधिक माहितीसाठी रवी बोरसे यांच्याशी ९८९०३७२८७५ व ९४०४९५०७७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या नव्या अत्याधुनिक मशिनमुळे रक्ती शुध्दीकरणाची प्रक्रिया देखिल आता अधिक योग्य पध्दतीने केली जात आहे.