<
जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रअंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता आवश्यक असणारी नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा मू.जे महाविद्यालयात दिनांक 2 ते 7 मार्च 2020 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेअंतर्गत वाणिज्य व्यवस्थापन विषयाकरिता पेपर 1 व पेपर 2 चे मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन परीक्षार्थींना लाभणार आहे.या कार्यशाळेत नवीन अभ्यासक्रमानुसार उत्तीर्ण झाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच परीक्षार्थींना पेपर 1 व पेपर 2 चा स्टडी मटेरियल संबंधित तज्ञांकडून देण्यात येईल या कार्यशाळेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून प्रत्येक दिवशी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात येईल.नाव नोंदणीची अंतिम मुदत 25 फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी डॉ. सी. एम. जोशी मो. 94 222 82 632 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.