<
जळगाव दि.१० – इतिहास विभागातर्फे 13 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे .महाराष्ट्राच्या राजकीय व्यवहारात, लोक व्यवहारात रूढ असलेली मोडी लिपी ही कालबाह्य होऊ पाहत आहे.अलीकडे शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश नसला तरी तिचे महत्त्व समजलेले नाही.
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाच्या शास्त्रशुद्ध मांडणी करता अभिलेखागार मधून पडून असलेल्या अप्रकाशित मोडी कागदपत्रांचे वाचन होणे आवश्यक आहे . तसेच आर्थिक व्यवहाराची खाजगी मोडी कागदपत्रातील मजकूर जाणून घेण्याची अडचण निर्माण झाली आहे, ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, व्यक्तींकरिता मोडी लिपी कार्यशाळा 13 ते 18 दरम्यान दुपारी 12 ते 2 या वेळेत महाविद्यालयात होणार आहे. या कार्यशाळेच्या नाव नोंदणी करिता डॉ. उज्वला भिरुड 94 209 42 639 यांच्याशी संपर्क साधावा असे संचालक सामाजिक शाळा प्रशाळा मू. जे महाविद्यालय यांनी कळविले आहे.