<
जळगाव – (प्रतिनिधी) – इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज दि.22-दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’ चे प्रक्षेपण केले.
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले ‘चांद्रयान-2’ यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी जल्लोष केला.
त्या आनंददायी क्षणाविषयी इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांना प्रक्षेपण व त्याविषयी माहिती देऊन उपक्रमशील शिक्षक राहुल चौधरी यांनी प्रेरित केले.
चांद्रयानाचे ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हर असे तीन भाग असून लँडरचं नाव ‘विक्रम’ असे ठेवण्यात आले आहे.
रोव्हरचे नाव ‘प्रग्यान’ असे ठेवण्यात आले असून हे सर्व भाग इस्रोने तयार केले आहेत.
ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील.याविषयी मार्गदर्शन राहुल चौधरी यांनी केले. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करून हे जगातला चौथा देश ठरला आहे चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना सदर उपक्रम साठी राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले .