<
जळगाव-(प्रतिनिधी)-अभाविप आयोजित मिशन साहसी या कार्यक्रमात अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी महिला सुरक्षे संदर्भात महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. अभाविप जळगाव च्या माध्यमातून 3 फेब्रुवारी वारी पासून विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे प्रशिक्षण जळगावातील विविध महाविद्यालयात देण्यात येत आहे. त्याचा भव्य सादरीकरणाचा कार्यक्रम आज जळगावातील शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट वीरांगना चंद्रकला गावित, प्रमुख वक्त्या अभाविप क्षेत्र विद्यार्थिनी प्रमुख प्रीतीजी नेगी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री स्वप्नील बेगडे, जळगाव शहराच्या महापौर सौ. भारती सोनवणे, स्वागत समिती अध्यक्ष प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल, महानगर अध्यक्ष प्रा.डॉ. भूषण राजपूत, महानगर मंत्री रितेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमात हिंगणघाट हेतील घटनेतील प्राध्यापकीचे मृत्यू झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा सत्कार करण्यात आला नाही व कार्यक्रमाच्या सुरुवातीस मोन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्त्या प्रीती निगी यांनी अभाविपच्या माध्यमातून राबविलेल्या झालेल्या मिशन साहसी अभियान ची माहिती उपस्थित विद्यार्थिनींना दिली. अभाविप फक्त आंदोलन व शैक्षणिक विषयात तर काम करतेच पण सामाजिक विषयात ही काम करते याच मिशन साहसी हे उदाहरण आहे यावेळी त्यांनी दिले. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थिनींनशी संवाद साधला व आभार प्रदर्शन रितेश चौधरी यांनी केले, कार्यक्रम सूत्रसंचालन सृष्टी पाटील हिने केले या भव्य प्रात्यक्षिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने शहरातील विविध महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.