<
जळगाव-(प्रतिनिधी)-केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नुकतेच बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.सर्वप्रथम केसीई सोसायटी चे शालेय समन्वयक के.जी.फेगडे , मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे व मुख्या रेखा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
लज्जतदार पापड , कुरकुरीत भेळ , खमंग ढोकळा , तिखट चटणी भाकर, फापडा, चना मसाला, कचोरी, समोसा, पाववडा , बटाटा भजी , आंबळ्याची भाजी व भाकरी , खाकरा , इडली सांभार अशा पदार्थांच्यादुकानांनी परिसरात वेगळी रंगत आणली.
ताई 5 रुपायचा बटाटा वडा द्या बर…., मी 10 रुपयांची नोट दिली मला 5 रुपये परत द्या….. चल रे आपण भेळ खावूया… मला तर बाई खाकरा खूप आवडतोय …… , ताई पाणी पुरी काय प्लेट दिली ..अशा शब्दात चिमुकले विद्यार्थी एकमेकांशी संवाद साधत होते.
या मेळाव्यातून विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वृद्धिंगत होण्यास मदत झाली तर विद्यार्थी स्वतः पैशांचा हिशोब करताना दिसून आले. दुकानदार विद्यार्थ्यांना व्यवसाय कसा केला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी आला.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका स्वाती पाटील व नेमीचंद झोपे यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.