जळगाव-केसीई चे आय. एम. आर. यांनी फेब्रुवारी २०२० रोजी युनिव्हेंटी स्तरावर“ मॅनेजर्स डे ” कार्यक्रम आयोजित केला. ” संस्था, प्रतिस्पर्धी संस्था आणि व्यक्ती यांच्यात काम करतांना वास्तविक जीवनातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि नेतृत्व कौशल्य विकास” हा या स्पर्धे मागील उद्देश होता”. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक आय. एम. आर. चे संचालक प्रा . डॉ शिल्पा के. बेंडाळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात ” विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी व कौशल्य वाढीसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन केले त्यांचे भाषण खूपच उत्साहवर्धक व प्रेरणादायक होते, या कार्यक्रमामध्ये विविध तीन विभागांचा समावेश होता.
१. एन्व्हिव्हो केसस्टडी प्रेझेन्टेशन
२. पोटपुरी अँड इंटरएक्टिव कार्यक्रम आणि
३. नेतृत्व आणि समन्वय कौशल्याची चाचणी करण्यासाठी डिझाइन केलेले स्टार्टागेम्स.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रा विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयातील सहभागी स्पर्धकांची संख्या एकूण 152 होती तर आय. एम. आर. मधून एकूण ३५० सहभागी स्पर्धक होते. कार्यक्रमांसाठी परीक्षक म्हणून केस स्टडी प्रेझेंटेशन साठी एसएसबीटी अभियांत्रिकी आणि आयटी चे डॉ.रिचा मोदियानी आणि डॉ अनुपमा चौधरी उपस्थित होते. पोटपुरी स्पर्धेसाठी काव्या बेदमुथा व ममता दहाड यांनी परीक्षण केले तसेच स्ट्रेटागेमसाठी ओरियन इंग्लिश मिडीयम स्कुल च्या कोमल पाटील व फिजिकल डायरेकटर नीलिमा पाटील यांनी परीक्षण केले. व्हेलिडिक्टरी समारंभ व बक्षीस वितरण साठी प्रमुख पाहुणे सुप्रासिध्य उद्योजक श्री सुदिप राणे, व्यवस्थापकीय संचालक एसपी फार्मास्युटिकल्स जळगाव हे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी” असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व प्रयत्नात यश मिळावे अशी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक स्पर्धेसाठी एकूण तीन बक्षिसे दिली गेली त्यात प्रमाणपत्र, करंडक, तसेच पहिल्या स्पर्धेसाठी 1500, 1000 आणि 750 चे रोख बक्षिसे देण्यात आली.
पारितोषिक विजेते खालील प्रमाणे :
१. एन्व्हिव्हो केसस्टडी प्रेझेन्टेशन या मध्ये
प्रथम : किंजल कोक्चर आणि संघ
द्वितीय : निशांत मांडे आणि संघ
तृतीय : हेमा नाथानी आणि संघ
२. पोटपुरी अँड इंटरएक्टिव कार्यक्रम आणि
प्रथम : प्रज्वल मणियार आणि संघ
द्वितीय :राज जैन आणि संघ
तृतीय : दिव्या झंवर आणि संघ
३. नेतृत्व आणि समन्वय कौशल्याची चाचणी करण्यासाठी डिझाइन केलेले स्टार्टागेम्स.
प्रथम : प्रियांका झंवर आणि संघ
द्वितीय : अक्षय सोनावणे आणि संघ
तृतीय : प्रज्वल मणियार आणि संघ
कार्यक्रमाचे सकाळ सत्राचे सुत्रसंचालन अंकिता वर्मा या विद्यार्थिनीने केले व बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन डॉ नितीन खर्चे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.अनिलकुमार मारथी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी , सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांचा सहकार्य लाभले.