<
भारतात दरवर्षी जवळजवळ 90 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजेच ग्रीवेचा कॅन्सर होतो. इतर देशातील महिलांपेक्षा आपल्या देशातील महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर हेाण्याचे प्रमाण अधिक आहे. पण त्याकडे तेवढे लक्ष दिले जात नाही कारण एकतर हा आजार महिलांना होणारा आणि बाकी सर्व आजारांना एवढे महत्व दिल्यामुळे या आजाराकडे तसे दुर्लक्ष झाले आहे.
भारतीय स्त्रियांमध्ये गर्भाशय व ग्रीवेचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. या प्रकारच्या कर्करोगाला गर्भाशयात ग्रीवेत सुरवात हेाते आणि तो हळूहळू योनी, गर्भाशय आणि शरीराचे इतर भाग यामध्ये पसरतो. गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग अत्यंत चोर पावलांनी, मंदगतीने येणारा आजार आहे. गाठींना उपद्रवकारी स्वरूप येण्यास काही वर्षाचा अवधी लागू शकतो.
इतर कर्करोगाप्रमाणेच हाही मुख्यतः उतारवयात हेाणारा आजार आहे पण तिशीनंतर तो केव्हाही होऊ शकतो. त्यामागचे कारण समजू शकलेले नाही. पण जर ग्रीवेला सतत सूज, जखम असेल तर गर्भाशयाचा कर्करोग हेाण्याची शक्यता जास्त असते. वारंवार हेाणारी बाळंतपणे, अपुरा आहार व अस्वच्छता, सूज आल्यावरही उपचार न हेाणे इत्यादीमुळे गरीब स्त्रियांना कर्करोग हेाण्याची शक्यता जास्त असते. अगदी लहान वयापासून समागम सुरु हेाणे, एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर संभोग तसेच काही प्रकारच्या विषाणूंमुळेदेखील ग्रीवेचा कर्करोग हेाण्याची शक्यता अधिक असते.
लक्षणे
- योनिमधून फार मोठया प्रमाणावर आणि मासिक पाळी नसताना हेाणारा रक्तस्त्राव, अनियमित पाळी, पाळीच्या वेळी जाणारा स्त्राव दूषित, तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो. कधीकधी पाण्यासारखा स्त्राव जातो आणि त्यात रक्ताचे थेंब असतात. समागमानंतर रक्तस्त्राव हेातेा.
- तिशीनंतर अंगावरून पिवळा, करडा किंवा रक्तमिश्रित स्त्राव जायला लागणे, वाईट वास येणे.
- पाळी बंद झाल्यावर अचानक परत अंगावरून रक्त जाणे.
- हा कर्करोग खूप पसरला की लघवी करतांना आग हेाते. बऱ्याच वेळा पाय दुखत असतात. पोटाच्या खालच्या बाजूला आणि पाठीत वारंवार दुखते.
गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाचे धोके जास्त कधी?
– पाळी सुरु झाल्यानंतर अल्पावधीत लैंगिक संबंध सुरु झाले आणि लहान वयात बाळंतपण झाल्यास ग्रीवेच्या कर्करोगाचा धोका संभवतेा. कमी वयात लग्न झाल्यास हे दोन्ही धोके वाढतात
– पूर्वी कधी प्रजननमार्गाचा रोग झाला असला तर
– जननेंद्रियाची काळजी नीट ठेवली नाही तर
– जननेंद्रियावरील चामखिळीसारखा एखादा विषाणूजन्य रोग हेाऊन गेला असेल तर
– बाळंतपणाच्या खूप खेपा झाल्या असतील तर कर्करोग हेाण्याचे प्रमाण वाढते.
ग्रीवेला जंतुलागण हेही गर्भाशयाच्या कॅन्सरचे सामान्य कारण आहे. परंतु सर्वच महिलांना (एच पी व्ही) जंतुलागण हेात नाही. ज्या महिला नियमितपणे पॅप स्मियर टेस्ट करत नाहीत त्यांना लवकर निदान न झाल्याने गर्भाशयाचा कर्करोग हेाण्याची जेाखीम वाढते.
निदान
– तरुण वयातील स्त्रियांपेक्षा पस्तिशी ओलांडलेल्या स्त्रियांना गर्भाशय, ग्रीवेचा कर्करोग हेाण्याचा संंभव अधिक असतो.
– वेळेवर निदान झाले तर तेा बरा हेाऊ शकतो.
– सुरवातीच्या काळात काहीही वेदना हेात नाही त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष हेाते किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येत नाही.
– अतिशय संथ गतीने हा रोग वाढत असतो. भयानक स्वरूप धारण करण्यास काही वर्षे जावी लागतात.
– आजार वाढल्याशिवाय हा आजार लक्षात येत नाही.
काय काळजी घेता येईल ?
साधारणतः पस्तिशी ओलांडलेल्या सर्व स्त्रियांनी दर 3 वर्षांनी एकदा पॅप टेस्ट करून घ्यावी. जिथे ही सोय नाही तिथल्या स्त्रियांनी ही चाचणी दर 5 वर्षांनी करून घ्यावी. ग्रीवेच्या निदानासाठी सर्वसामान्यपणे केली जाणारी चाचणी म्हणजे पॅप स्मियर टेस्ट. ती झटपट हेाते आणि साधी व सोपी असते. म्हणून पॅप टेस्ट ही महत्वाची समजली जाते.
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’