चोपडा-(प्रतिनिधी) -दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षला घवघवीत यश मिळाल्यानंतर चोपडा शहरात फटाके फोडून फोडून व साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष रईस खान, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे, तालुका सचिव राजमल पाटील , मीडिया प्रवक्ता विवेक गुर्जर , नईम शेख, शेहबाज खान, जियाओद्दीन काझी, कम्युनिस्ट पक्षाचे अमृत महाजन , हाजी उस्मान, सागर पाटील, अबुलेस शेख, दिनेश पवार, निलेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष रईस खान यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे लोकशाही मूल्यांचा खऱ्या अर्थाने विकासात्मक विजय होय. ह्या विजयाने माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आहे. व आप ला नवसंजीवनी प्रदान झाली आहे. ह्या विजयाची प्रेरणा आम्हास सदैव स्मरणीय असेल.
जाती धर्मा पलीकडे जाऊन आता मतदार जनता ही विकासात्मक बाबींवरच मतदान करणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील जनतेचा व केजरीवालजी यांच्या सह त्यांच्या टीम चा खूप खूप अभिनंदन करतो असे यावेळी सांगितले.