जळगाव-(प्रतिनिधी) – भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या क्रीडांगणावर दि.12-13 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क. ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. जे. बी. नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी प्रा.डॉ.जे.बी.नाईक म्हणाले की, प्रत्येक युवकाने खेळात सहभाग घेतल्यास राष्ट्र बलशाली व सशक्त होण्यास मदत होईल तसेच नेहरू युवा केंद्र जळगाव अंतर्गत ज्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा राबवल्या जात आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे अशा क्रीडा स्पर्धेच्या मध्यातून युवकांमध्ये खेळा प्रती जागरूकता व सुदृढ भारत निर्माण होण्यास मदत होईल असे सांगितले.
उद्घटनप्रसंगी विचार मंचावर धनदाई महाविद्यालय अमळनेरचे क्रीडा संचालक प्रा.शैलेश पाटील विद्यापीठ क्रीडा विभागाचे ललित काटकर व श्रीमती व्ही.एस.जाधव, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक देविका सपकाळे, निखिल मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन व क्रीडा स्पर्धेचे नियोजन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदास कोचुरे यांनी पाहिल. आभार देविका सपकाळे यांनी मानले. यशस्वितेसाठी अमोल हळदे, अल्ताप तडवी, चेतन वाणी, शाहरुख पिंजारी, भूषण ठाकरे व कुलदीप ठाकरे यांनी प्रयत्न केले.