जळगाव-(जिमाका) – शासकीय सहकार व लेखा पदविका जी. डी. सी. ॲड ए, परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र सी. एच. एम. परीक्षा दिनांक 22 ते 24 मे, 2020 या कालावधीत जळगाव केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रशिक्षार्थीकडून Online पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहे. Online Application व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. परिक्षेचे Online अर्ज भरण्याची मुदत दिनांक 15 फेब्रुवारी, ते 16 मार्च, 2020 पर्यंत असून Online अर्ज भरण्याबाबत सविस्तर अधिसूचना सहकार खात्याच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या Website वर भरता येतील.
तरी जे परीक्षार्थी सदर परिक्षा देवू इच्ठितात अशा परिक्षार्थीनी परिक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या वरील Website वरुन घ्यावी. असे आवाहन मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.