<
जळगाव – येथील केसीईज आय एम आर या संस्थेला आय आय एम कोझीकोड यथे संपन्न झालेल्या AIMS अंतरराष्टीय परीषदेत सर्वोत्तम संस्था मान्यता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आय आय एम कोझीकोड चे संचालक डॉ देबाशिष चटर्जी यांच्या हस्ते आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांच्या वतीने डॉ विशाल संदानशिवे यांनी स्विकारला. यावेळी NMIMS चे संचालक डॉ प्रृथ्वी शहा यांचीही उपस्थिती होती.या यशाबद्दल के सी ई चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि केसीई व्यवस्थापन समीतीने सर्वांचे अभिनंदन केले आहे.