<
जळगाव- झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथे आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मु. जे. महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहा पारितोषिके पटकावत घवघवीत यश संपादन केले. पोस्टर स्पर्धेत पाटील मयूर (FY BSc) ह्याने प्रथम क्रमांक तसेच झांबरे कल्याणी (SY BSc) व ठाकरे दीपमाला (TY Bsc) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रश्नमंजुषा (क्विझ) स्पर्धेत चावरे रोहित (FY BSc) ह्याने द्वितीय , विश्वकर्मा आदिपकुमार (TY Bsc) ह्याने तृतीय व जाधव श्वेता (TY Bsc) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.या स्पर्धेस विभाग प्रमुख डॉ. के. जी. खडसे, प्रा. डॉ. योगिता वाघ, प्रा. कविता डहाके, मणियार यांचे सहकार्य लाभले. के. सी. ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य एस. एन. भारंबे व संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक वृंद यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.