<
टीम MGM च्या वतीने अँड. पवन राजे यांच्या नेतृत्वाखाली काढला मोर्चा
जळगांव(प्रतिनीधी)- अनेक महिन्या पासून पुर्णाड सबस्टेशन वरून थ्री फेस विद्युत पुरवठा सुरळीत होत नसून शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका हा सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरी पणा तसेच गारपिटी ने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढच्या १० दिवसाच्या आत थ्री फेस विद्युत पुरवठा सुरळीत नाही झाल्यास भव्य असा शिंगाडा मोर्चा महावितरणावर काढून रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांचे वतीने करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अँड. पवनराजे पाटील यांच्या मार्फत देण्यात आला व त्या संबंधी कार्यकारी अभियंता महेश पाटील तसेच उप कार्यकारी अभियंता अजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे श्री.शेजोळे उपस्थित होते. सदर प्रसंगी अँड. पवनराजे पाटील, साहेबराव पाटील, जगनाथ पाटील, शेषराव पाटील, गोपाळ पाटील, भागवत पाटील, सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, आत्माराम पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, विनायक पाटील, हर्षल पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, शांताराम पाटील, राहुल पाटील, श्रीकांत पाटील, राजेंद्र पाटील, भोला पाटील, मोहन पाटील, नितीन पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.