<
जळगाव-केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ९ ते १५ फेब्रुवारी या दरम्यान मोहाडी या गावात विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या बौद्धिक सत्रात मुळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार यांनी “राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा” या विषयावर तर डॉ. जी. के. महाजन यांनी आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी रा.से.यो च्या विद्यार्थ्यांनी “व्यसनमुक्ती” या विषयावर पथनाट्यद्वारे संदेश दिला. शिबिरावेळी प्रा. डॉ. वंदना चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. गणेश पाटील, प्रा. किसन पावरा, प्रा. पंकज पाटील, विजय चव्हाण उपस्थित होते.