<
जामनेर पोलिसांनी आपल्या खाकी वर्दी तुन माणुसकीचा धर्म दर्शविला
जामनेर – (प्रतिनिधी) – दारुच्या व्यसनामुळे कित्येक पिढ्या बरबाद होऊन चांगले संसाराची राख रांगोळी होते .व परीवार उघड्यावर पडल्याचे चित्र आज समोर आहे . असाच एक प्रत्यय गुरुवारी आला . शहरातील इंदिरा आवास परीसरातील संध्या ईश्वर पालवे ह्या आपला मुलगा . हर्षल, मुलगी दिपाली व मयुरी यांना घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाल्या . नवरा काम धंदा करीत नाही , रोज दारु पिऊन मारहाण करतो , मुलांना शाळा शिकवीत नाही या त्रासाला कंटाळुन अखेर आत्महत्या करावी असे मनात आले पण एक प्रयत्न म्हणुन पोलीसांना सांगावे या हेतुने पोलीस ठाणे गाठुन ही संध्या हिने आपली परिस्थिती मांडली . पण खाकीच्या आड माणुसकीचा जिवंत झरा असलेले जामनेर पो. स्टे . चे पो . नि प्रताप इंगळें यांनी त्या महिलेचे क्षणभर गाऱ्हाणे ऐक्ले .व तात्कळ गाडी काढुन तिन्ही मुलांना शैक्षणि क साहीत्य वह्या , पुस्तके, ईं वस्तु घेऊन दिले .व चांगला अभ्यास करून दहावीत गुण मिळव आणी पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले .पतीला सुदधा समज देण्याचे सांगितले . किमान मुलांसाठी तरी तुला जगावे लागेल . मायेने तिच्या डोक्यावर हात ठेऊन माणुसकीचा धर्म पाळला . त्या वेळी पोलिस कर्मचारी स्वप्ना देशमुख , योगेश महाजन, ईस्माईल शेख, आदि यांनी सहकार्य करून एक नवा आदर्श घडविला .