<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील सिंध कि कलिया सोशल गृप
व जळगाव सिंधी युवा मंच च्या संयुक्त विदयमाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी एक दौड़ स्वस्थ समाज के लिए -“सिंध रन २०२०” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धे मध्ये २३०० च्या वर सिंधी स्पर्धक सह ७६०० च्या वर प्रेषक म्हणून इतर समाज बांधव उपस्थित होते, प्रामुख्याने विशिष्ट समाजासाठी ही स्पर्धा होती.
सदर स्पर्धेला खानदेश सेन्ट्रल मॉल, नेहरू चौक जवळ जळगाव येथुन भल्या पहाटे प्रारंभ झाला. त्यात ३ कि. मी. ,५ कि. मी. ,१० कि.मी. अशा वेगवेगळ्या अंतर्प्रकारात घेतली गेली होती. विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र तसेच आकर्षक पारितोषिके देऊन गौरवान्वित करण्यात आले, स्पर्धे मध्ये पुणे, दोंडाईचा. भुसावळ, अमळनेर, पाचोरा, व देशातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, जळगाव रनर ग्रुप, पिंकथोंन, कृपाल आश्रम डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिशन, अर्थोपेडीक असोसिशन, केळकर मार्केट असोसिशन, व इत्तर सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. सदरील स्पर्धेसाठी मंदिर दरबार व सर्व सिंधी पंचायतींचे प्रोत्साहन व पाठबळ लाभले. सूत्रसंचालन पंकज दारा व रेश्मा बेहरानी यांनी केले, मॅरेथॉन मध्ये आकर्षक सेल्फी पॉईंट व इतर मनोरंजन साठी पुरे पूर प्रयत्न केला होता . मॅरेथॉन मध्ये पाच वर्षांपासून ते ७८ वर्ष वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन साठी किशोर बेहरानी, अनुप तेजवानी, अमित गगनानी, सुरेश चावला, धीरज वालेचा, सुनील सुखवानी, पिंटू लुल्ला, विजय शामलानी, दीपक कुकरेजा, अमर कुकरेजा , सुशील हसवानी, राकेश दारा, सुनील सुकूवानी, रितू रायसिंघाणी, किरण दार, ममता गोमननी, मंजू चुज्वानी, कल्पना टेकवानी, हर्षा केसवानी, मीना कटारिया , ओम प्रकाश सचदेव, नरेश कावणा, सतीश मतानी, विजय कुकरेजा, अमित गगनाणी, डॉ. समीक्षा तलरेजा प्रवीण मतांनी, रितेश नाथानी, बंटी रामचंदानी, पवन रामाणी, अशोक चंदानी, राजेश जवाहराणी ग्रुप व इतर आयोजकांनी मेहनत घेतली, रन संपन्न झाल्या नंतर संपूर्ण रनचा मार्ग स्वछ करण्यात आला कोणालाही वाहतुकीचा त्रास होणार नाही याची हि काळजी आयोज कान कडून करण्यात आली. स्पर्धे साठी पोलीस विभाग व महानगर पालिका, यांचाही अनमोल सहकार्य लाभले.
विजेत्यांची नावे १० किलो मीटरमध्ये प्रथम विकी चेटानि तिय मानव पंजाबी तृतीय राजा पेहवनी १० किलो मीटरमध्ये महिला प्रथम विजेते रिया कौरानी व जेस्ट महिला मध्ये संगीता चावला
५ किलो मीटरमध्ये प्रथम सत्य स्वरूप तलरेजा . दुतिय आदित्य नाथानी तृतीय अमित तोलानी हे विजेते झाले.