चिमुकल्याच्या देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- जि.प.उर्दु कन्या शाळा नं.२ मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमातून मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचा मानस यशस्वी झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.अमीर साहेब हे होते. इशस्तवन प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. शाळेच्या पूर्ण कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, बाल गीते, कव्वाली, कवी संमेलन, न्यूज चॅनल ची विनोदी नाटिका, कुराण चे महत्व, बडबड गीते, मोबाईल चे दुष्परिणाम यासारखे विषयांचा समावेश करून मनोरंजनासह समाजप्रबोधन केले गेले. कार्यक्रमासाठी काजिम सर, जफर सर, अल्तमश सर, सुमेरा मॅडम, मुनाज्जा मॅडम, सानिया मॅडम, असमा मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन सैय्यद निकहत मॅडम तर आभार प्रदर्शन जफर शेख सर यांनी मानले.