जळगांव(प्रतिनीधी)- विषयावर अधारीत जनजागृती व शिक्षण उपक्रम अंतर्गत नेहरू युवा केन्द्र जळगाव यांचे वतीने “रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जबाबदारी “या विषयावर विशेषकार्यक्रमाचे आयोजन मु जे महाविद्यालय जळगाव येथे दि १७ फेब्रुवारी २०२० सकाळी १० वाजता सोहम हाँल येथे आयोजित करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रस्ते अपघात आणी त्याची वाढत चाललेली संख्या ही खुप चिंतेची बाब आहे. त्याची आनेक कारणे असली तरी तरी या महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर आता सर्वान एकत्र येऊन जनजारणाची मोठी मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. रस्ता सुरक्षा युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर नेहरू युवा केन्द्र व राष्ट्रीय सेवा योजने च्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी सांगितले व रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जवाबदारी हे ब्रिद देऊन युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ पी पी माऊलीकर होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री माने साहेब प्रमुख मार्गदशक म्हणून उपस्थित होते. “रस्तासुरक्षा -युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या हस्ते . रस्ता सुरक्षा भिंती चित्र (पोष्टर) प्रकाशन व रस्ता सुरक्षा स्वाक्षरी मोहीमला प्रारंभ करण्यात आला. मु.जे. महाविद्यालयाच्या उप प्राचार्य डॉ गौरी राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हायुवा समन्वय नरेंद्र डागर व राष्ट्रीय सेवा योजना संचलक डाँ पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विनोद ढगे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी महाले सरांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमच्या यस्वितेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन दुर्गेश आबेंकर देवराज शिप्पी अरविंद पाटील आकाश धनगर अनिल बाविस्कर या परिश्रम घेतले.