<
जळगाव-(प्रतिनिधी)-के.सी.ई.सोसायटी संचलीत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अशोक राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने करण्यात आली . मज आवडते ही मनापासून शाळा लावते लळा जसा माऊली बाळा …… अशा शब्दात आपल्या शाळेचे आभार व्यक्त करून शाळेचे नाव पुढे उंचावण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहण केली. शिक्षकांच्या वतीने रोहीणी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांच्या वतीने आदित्य दलाल,शिवानी नाईक, तेजस बोरसे, मानसी खेडकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अशोक राणे यांनी आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचे आहे.आपले व्यक्तिमत्व कसे असले पाहिले.आपल्या आईवडिलांचे ऋण आपणे कसे फेडावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पायल राठोड आणि पर्णिका पाटील यांनी विविध मनोरंजनाचे खेळ सादर केले. प्रसंगी शालेय समन्वयक के. जी.फेगडे, प.वि पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे ,एम.एस.नेमाडे,ए.एन.पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी बी कोळी यांनी तर आभारप्रदर्शन पूनम कोल्हे यांनी मानले.