<
जळगाव – के सी. ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवा निमित्त, मू. जे. महाविद्यालय (स्वायत), व पी. जी. कॉलेज ऑफ सायन्स, यांचे संयुक्त विद्यमाने गणित व संख्याशास्त्र च्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर सिरीज नुकतीच १५ रोजी आयोजित करण्यात आली होती. यासाठी विविध नामांकित संशोधन संस्थांमधून संबंधीत विषयाचे तज्ञ प्राध्यापकांना आमंत्रीत केले होते. सकाळच्या सेशन मध्ये डॉ. धनंजय डे. सायंटीस्ट (एफ), संरक्षण मंत्रालय, केंद्र सरकार, दिल्ली यांनी कोडींग थेअरी व क्रीप्टोग्राफी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून नंबर-थेअरी व अलजेब्रा यांचे उपयोजन कसे केले जाते ते उदाहरणासह स्पष्टीकरण केले.
दुपारच्या सत्रात प्रा. डि. पी. पाटील, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर यांनी फायनाईट फील्ड्स संबंधी अगदी सोप्या पद्धतीने पद्व्युतर वर्गातील विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्या व्याख्यानामध्ये डॉ. पाटील यांनी थेअरी ऑफ इक्वेशनचे महत्व फायनाइट फिल्ड मध्ये कसे करता येते ते पटवून दिले.
सकाळी गेस्ट लेक्चर सेरीजच्या उद्घाटन प्रसंगी मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तर व्यासपीठावर पी. जी. कॉलेजेचे प्राचार्य. डॉ. व्ही. एस झोपे. व मू. जे महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रमुख प्रा. जे. एन. चौधरी उपस्थित होते, यावेळी प्रा. श्रीकांत चौधरी डायरेक्टर स्कूल ऑफ मॅथेमेटीकल सायन्स हे हजर होते. ह्या लेक्चर सिरीजचा दोन्ही कॉलेजमधील १५० प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.