<
जळगाव- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, समाज कल्याण, जळगाव व ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन तथा चरितार्थ व कल्याणार्थ नियम 2010 नुसार मार्गदर्शनपर शिबीर 17 फेबुवारी 2020 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमास फैजपूर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ दिलीप बोरसे, भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲङ कौशिक ठोंबरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडीतराव सोनार, उपाध्यक्ष ॲङ अरूण ओंकार धांडे, चिटनिस देविदास पंडीत पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणार्थ मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे राजेंद्र सोनवणे, प्रमोद पाटील तसेच समाज कल्याण कार्यालयाचे महेंद्र चौधरी, अरूण वाणी, लता अडकमोल, किशोर माळी, जितेंद्र धनगर, पगारे आदिंनी परिश्रम घेतले.