<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक, तमाम मराठी माणसाच्या मना- मनांवर गारुड करणारे स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 389 वी जयंती शहरातील नगर परिषद जवळ माँ साहेब जिजामाता चौकात सर्व पक्षीय नेत्यांच्या सहभागातुन जल्लोषात साजरी करण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या साठी गर्वाची गोष्ट असुन शिवजन्मोत्सव सालाबाद प्रमाणे आपण अनोख्या पदधतीने साजरा करुन त्यातुन एकोपा कायम राहुन शहराची एकात्मता अबाधित राहते. म्हणुन आपण सर्वांनी सर्व धर्माचे, जातीचे,एकतेची मोट बांधुन शिवजयंती साजरी करणे हीच काळाची गरज. असे प्रतिपादन जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष- साधना महाजन यांनी केले . त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन केले व उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या,
तसेच तळेगाव येथील नंदु पाटील व शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले.
वाडीकिल्ला येथील शाळकरी मुलांनी महाराजांनी केलेल्या कर्तबगारी व शुरते वर प्रबोधनपर व्याख्यान सादर केले.
यानंतर बोहरा स्कुल येथील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखान वधावर पोवाडा गायला.
अशाप्रकारे कार्यक्रमाला अनेक ठिकाणी शिवक्तांनी यश मिळविले .
त्यावेळी जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, पंचायत समितीच्या सभापती प्रमिला पाटील, जि .प.सदस्य रजनी चव्हाण, नगरसेविका संध्या पाटील , बाबुराव हिवराळे, डॉं प्रशांत भोंडे महेन्द्र बावीस्कर , आतिश झाल्टे कैलास नरवाडे, सुहास पाटील, पो . नि . प्रताप इंगळे, जे .के. चव्हाण, जोत्सना विसपुते , चंद्रकांत बाविस्कर, दिपक तायडे, शेख अनिस, किशोर झांबरे, नवल पाटिल प्रदिप गायके, शंकर राजपुत,नितीन झाल्टे,विनोद पाटिल, विजय शिरसाठ, संतोष झाल्टे, सोपान चौधरी, सावन कोळी, गोपाल शिरसाठ, प्रभु झाल्टे, जावेद मुल्लाजी, व सर्व पक्षांचे पदाधिकारी , विविध संघटनांचे कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .