<
जळगाव(प्रतिनिधी): गणेश कॉलोनी स्थित प्रगति विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद या पद्धतिनुसार गमंत चुंबकाची या उपक्रमातुन कृतियुक्त शिक्षण दिले.यात त्यांनी चुंबकाचे विविध प्रकार,चुंबकीय-अचुंबकीय पदार्थ,चुंबकाची वैशिष्ट्ये, चुंबकाचा उत्तर ध्रुव-दक्षिण ध्रुव, आकर्षण-प्रतिकर्षण इत्यादीविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातुन व विद्यार्थ्यांच्या कृतियुक्त सहभागतुन सर्व मुद्दे सविस्तर समजावून सांगितले. प्रत्यक्ष चुंबकाचे प्रात्यक्षिक बघुन व त्यांचे वैज्ञानीक वैशिष्ट जाणून विद्यार्थ्यांना शिकण्यात व महिती जाणून घेण्यात कुतूहल वाटत होते.त्यांनी यातील काही प्रात्यक्षिक लहान असताना केलेले होते पण त्या लहानपनीच्या खेळात सुद्धा विज्ञान लपलेले आहे.हे बघुन त्यांना आश्चर्य वाटत होते.यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचा दृष्टिकोण हा वैज्ञानीक दृष्टिकोण बनेल व त्याना विज्ञान विषयाच्या अभ्यासाची गोडी लागेल हा उद्देश्य या उपक्रमातुन साध्य होत आहे.