<
प्रदिप अनिल साळी ग्रा पं सदस्य नशिराबाद यांच्या तक्रारीची दखल
जळगांव(प्रतिनीधी)- काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीसाठी वार्डनिवाय आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली. वार्ड क्र ४मध्ये या पूर्वी जनरल पुरुष २ओबीसी व ३एससी माहिला असे होते, परंतु आता झालेली वार्ड आरक्षण माहिला जनरल २ माहिला एससी पुरुष असे करण्यात आले. या चुकीच्या निर्णयाविरीध्द ग्रा पं सदस्य प्रदिप साळी यांनी तहसिलदार यांच्याकडे ७/२/२०२० लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल मा. उपविभागीय अधिकारी जळगांव यांनी घेतली त्यानुसार त्यांनी ग्रा. पं. हरकत तक्रार दि. १७ रोजी नोटीस बजावली. सदरची नोटीस उपविभागीय अधिकारी जळगांव यांच्या सही शिक्कानिशी दिली असे पत्र मिळाले असून त्यावर योग्य निर्णय आपला विभागाकडून घ्यावा व वार्ड क्र ४ चे आरक्षण पूर्वी प्रमाणेनेच करावे वार्डक्र ४ च्या निर्णयाकडे संपूर्ण नशिराबाद च्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्या विषयी ग्रा पं सदस्य व तक्रारदार प्रदिप साळी निर्णय योग्य बाजूने लागावा अशी आशा व्यक्त केली आहे.