<
मु. जे. त ध्यान आणि मेंदू विज्ञान कार्यशाळेचे आयोजन
जळगाव दि. २२ – आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिध्द करण्यासाठी प्रत्येकजण बेभान होऊन आपआपल्या क्षेत्रात धावतो आहे. एकूणच वाढत्या स्पर्धेत दिवसागणिक वाढणाऱ्या अपेक्षांचे ओझे यामुळे हल्ली प्रत्येकाच्या मनात इर्षा, द्वेष, मत्सर, अनामिक भीती ( फोबिया) आणि नैराश्य हे मानसिक आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. हा मनातील कचरा असून तो काढून टाकण्यासाठी ध्यानयोग करणे हे शरीर, मेंदू या दोघांसाठी नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यशवंत वेलणकर यांनी केले.
के. सी.ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुळजी जेठा महाविद्यालयातील मानवी मूल्ये प्रशाळा अंतर्गत ‘ध्यान आणि मेंदूविज्ञान’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन जुना कॉन्फरन्स हॉल येथे करणात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी के.सी. ई. सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दिलीप बोरसे, मानवी मूल्य प्रशाळेच्या संचालिका प्रा.डॉ. रजनी सिन्हा, ग्रंथपाल विजय कंची, सोहम आणि योगा विभागाच्या संचालिका प्रा. आरती गोरे तसेच जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. संदीप केदार व्यासपीठावर होते. तर अध्यक्षस्थानी मू.जे. महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय भारंबे होते.
मान्यवरांच्या हस्ते ओंकार पूजनाने या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. रजनी सिंन्हा यांनी केले. प्रा. व्ही. एस. कंची यांनी आपल्या मनोगतात मानवी मूल्य प्रशाळे विषयी माहिती दिली.
नकारत्मकता दूर ठेवण्यासाठी ध्यानसाधना गरजेची
( मानवी विचार आणि भावना यांचा शरीर आणि मेंदू वर होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचे विश्लेषण करत या परिणामांपासून वाचण्यासाठी ध्यान किती आवश्यक आहे आणि ते करण्याच्या योग्य पद्धती कोणत्या याचे मार्गदर्शन डॉ. यशवंत वेलणकर यांनी केले. सोबत त्याचे प्रात्यक्षिकही उपस्थितांकडून करून घेतले. )
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. केतकी सोनार, तर आभार प्रा. संदीप केदार यांनी मानले. यावेळी दैनिक सकाळचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रा. प्रशांत सोनावणे, प्रा. अभय सोनवणे, तांत्रिक विभाग प्रमुख संजय जुमनाके,तत्वज्ञान विभागाच्या प्रा. राजश्री पाटील, प्रा. अमोल पाटील, आदींनी प्रयत्न केले.यावेळी प्रा. योगेश बोरसे, प्रा. सुनील गुरव यांच्यासह अपूर्वा वाणी, राहुल पवार, आकाश बाविस्कर, सागर निकवाडे , लोकेश कठाळे आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.