<
जळगाव दि.२२- के सी ई सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कला व मानव विद्याशाखेचा वतीने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘महात्मा गांधी: विचार, कर्तुत्व आणि प्रासंगिकता’ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील नवीन कॉन्फरन्स हॉल येथे गीता धर्मपाल यांच्या हस्ते होणार आहे. गीताधर्म पाल या जर्मनी येथील हैडलबर्ग विद्यापीठात इतिहास विषयाच्या प्राध्यापिका होत्या, सध्या येथील गांधी संशोधन केंद्र येथे कार्यरत आहे त्याचबरोबर या चर्चासत्रात प्राध्यापकांचा परिसंवाद आणि विद्यार्थ्यांचे शोधनिबंध वाचन इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सदर चर्चासत्रास उपस्थितीचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स.ना.भारंबे व समन्वयक प्रा. अनिल शिरसागर यांनी केले आहे.