<
जळगाव – दि. १२ मार्च रोजी जागतिक किडनी दिवस आहे. त्या निमित्ताने संपूर्ण जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या निमित्तानेच येत्या १ मार्च रोजी औरंगाबाद शहरात भव्य किडनीथॉन म्हणजेच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. जळगावसाठी ही अभिमानाची बाब आहे की या मॅरेथॉनच्या इव्हेन्ट अँबेसेडर म्हणून जळगावच्या किशोर सूर्यवंशींची निवड करण्यात आली आहे. या संदर्भाचा मेल नुकताच किशोरला प्राप्त झाला आहे.
औरंगाबाद शहरात किडनी दिनानिमित्त दरवर्षी किडनीथॉनचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तरुणाई आणि क्रीडाप्रेमी आणि त्या सोबतच अवयव प्रत्यारोपण झालेल्या, अवयव दान केलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक मोठया प्रमाणात सहभागी होत असतात. अवयव दान जनजागृतीसाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असते. १०, ५ आणि २ किलोमीटर अश्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे. किशोरने गेल्या वर्षी इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व केले होते. इंग्लंड येथे झालेल्या या गेम्स मध्ये भारतातून एकूण पंधरा खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव किशोरची निवड करण्यात आली होती. अवयव प्रत्यारोपण झाल्यानंतर देखील फिट अँड फाईन राहून आयुष्य मजेत जगता येतं हा संदेश देण्यासाठी या जागतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं.
धावणे आणि बॅडमिंटन या क्रिडा प्रकारांमध्ये किशोर नियमित सराव करीत असतो. वेगवेगळ्या शहरात आयोजित होणाऱ्या विविध किशोर सहभा सकाळी जवळ-जवळ दोन तास या सरावासाठीतो तो देत असतो. या सोबतच तो छाया किडनी फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयव दान चळवळीवर देखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत कार्य करीत आहे. जागतिक किडनी दिनानिमित्त छाया किडनी फाऊंडेशन तर्फे दि. १३ मार्च रोजी ऑर्गन डोनेथॉन या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद मॅरेथॉनसाठी इव्हेन्ट अँबेसेडर म्हणून झालेल्या या निवडी बद्दल किशोरचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.