<
जळगांव(प्रतिनिधी)- एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृती १५ व्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी, उत्ताण चे माजी सहसंचालक मा. प्रमोद डी. आंबेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने करण्यात आले. या समारंभास जळगांवचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. जी. ए. सानप यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच केसीई सोसायटीचे सचिव अँड. एस. एस. फालक केसीई सोसायटीचे सदस्य यांची उपस्थिती लाभली. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, केसीई सोसायटीचे सहसचिव अँड. प्रमोद पाटील, मुट कोर्ट सोसायटी समन्वयिका डॉ. विजेता सिंग हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश बी. पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालयीन अधिकारी डी. ए. देशपांडे, जिल्हा सरकारी वकील अँड. केतन ढाके, जळगांव जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ऍड दर्शन देशमुख, पॅनल जजेस व महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोदर, प्रा. अमिता वराडे, प्रा. ज्योती भोळे, प्रा. चौधरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. आंबेकर यांनी भारताच्या विविधतेतील एकात्मतेचा आधार हे भारतीय संविधान असून त्यातील मूलभूत ढाच्याचा भाग असलेली संघराज्य पद्धती आपल्या देशासाठी अनुकूल असल्याचे स्प्ष्ट केले. तसेच, कायदा, न्यायालय, वकील या सर्वांचे अंतिम ध्येय न्याय देणे आहे व न्याय देण्यासाठी केवळ कायद्याचा अभ्यास पुरेसा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषेवर आणि तथ्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच न्या. सानप म्हणाले की, तुम्ही स्वेच्छेने वकिली क्षेत्र निवडले असेल तर खूप परिश्रम घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकणार नाही. तसेच तुमच्या प्रतीपक्षांच्या वकिलांशी मैत्रीचे संबध ठेवा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच अँड. सुनील चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य. डॉ. युवाकुमार रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात उपस्थित मान्यवर पाहुणे आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे स्वागत केले. मा. आंबेकर व मा. सानप यांचा संस्थेच्या वतीने अँड. प्रकाश बी. पाटील यांनी सत्कार केला. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
तदनंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिया मोटवानी, प्रतीक्षा मराठे, दुर्वेश मराठे यांना सुवर्ण पदक प्राप्त झाल्याबद्दल तर प्रियंका चव्हाण व मेघा दुज्जूका यांचा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी निरंजन ढाके आणि कु. सुजाता वाघोडे यांनी केले तर डॉ. डी. आर. क्षीरसागर यांनी आभार मानले.