<
जळालेला संसार उभा करण्यासाठी दिली तात्काळ मदत
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील पाचोबा शिवारात राहणाऱ्या भिल्ल बांधवांच्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत ४ कुटुंबांचा संसार उध्वस्त झाला होता.
यात त्यांच्या जीवनावश्यक साहित्यासह 12 हजार रुपयांची कष्टाची कमाई देखील जळून खाक झाली होती.
अचानकपणे आलेल्या या संकटामुळे या ४ कुटुंबांना उघड्यावर राहायची दुर्दैवी वेळ आली. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह भेट देत त्या कुटुंबातील सदस्यांना आधार दिला. शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र आजच या कुटुंबांवर उघडयावर राहायची वेळ आल्यामुळे तसेच होते नव्हते ते जळाल्याने तातडीने त्यांना मदत देणे गरजेचे होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने या ४ कुटुंबांना छत उभारण्यासाठी आवश्यक लोखंडी पत्रे व लोखंडी अँगल वैयक्तिक देण्याचे जाहीर केले, नुसते आश्वासन नाही तर लागलीच त्यांनी संबंधित एजन्सी ला फोन लावून सदर मदत देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट तात्या भोळे, पंचायत समिती सदस्य सुभाष दादा पाटील, गिरीष बराटे, निवृत्ती कवडे, रणजित पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नुकसानग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते.