<
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मोठया उत्साहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
जळगांव(प्रतिनिधी)- येथील मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाऊडेशनच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार२०१९ -२० नुकताच मोठ्या दिमाखात दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडला. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य अशा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष मा. प्रवीण सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे तथा ग.स. सोसायटी अध्यक्ष मा. मनोज पाटील हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डीगंबर देवांग, उद्योजक अनिल कासट, साहित्यिक अ.फ. भालेराव, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, अँड. स्वाती निकम, माता रमाई महिला मंडळच्या अध्यक्षा शुभांगी बिऱ्हाडे, नोबल स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी, हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या संचालिका भारती काळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सलीम इनामदार, इम्रान शेख आदी उपस्थित होते.
प्रसंगी, आपले शहर हे सुसंकृत शहर करण्याची प्रबळ इच्छा असणे महत्वाची आहे आणि हि इच्छा बाळगणारे राज्यातील शहरात आहेत. अशा हिऱ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना सन्मानित करुन त्याच्या कार्याची गती वाढविण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे अंत्यत महत्वाचे असून पुरस्कार हे प्रेरणा देतात व प्रेरणेतून राष्ट्रनिर्मिती होत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले. तसेच मला देखील पहिल्या पुरस्काराने विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून आज रोजी फाऊंडेशनच्या माध्यमातून १० वर्षापासून निरंतर कार्य सुरु असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती राणे यांनी तर आभार सुवर्णलता अडकमोल यांनी मानले. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रविण पाटिल, अमित माळी, गिरिश नेहते, मनोज भालेराव, चेतन निंबोळकर, राकेश कंडारे, गणेश जोशी, साजिद शेख, प्रविण धनगर, पुर्वा दिवटे आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
जीवन गौरव- इकबाल मिर्झा(क्रिडा), छाया पाटिल(सामाजिक), अब्दुल पटेल(शैक्षणिक)प्रशांत भगवान सुर्यवंशी, रणजित शिरसाठ, सविता नामदेव ठाकरे, निखिल जयंतीभाई ठक्कर, मीना बाबुलाल परदेशी अ. फ. भालेराव, किशोर रामदास रायसाकडा, शरद प्रभाकर भालेराव, अविनाश समरसिंग कुमावत, अहमदुल्लाखान अब्दुल्ला खान, किरण प्रकाश माळी, राजू दशरथ मोरे, नाजनीन शेख रईस, कुणाल रावसाहेब मोरे, हेमंतकुमार सुरेश सोनार, रामेश्वरी अरुण बडगुजर, चंद्रशेखर कडू कापडे, किशोर हरी घुले, सुरेखा सुनील चौधरी, निंबा पूना बडगुजर, सदानंद धडु भावसार, जितेंद्र किसन शिंदे, शरद शांताराम विसपुते, सूर्यकांत रवींद्र वराडे, सुनील न्हानू दाभाडे, प्रतिभा आर. पाटील, किशोर शालीग्राम पाटील, संदीप शरदराव कुलकर्णी, वैशाली सिंधू रोहिदास झाल्टे, सुरेश रमेश पाटील, डॉ. लक्ष्मी उमेश भारती, कु.दिशा विजय पाटील, दिनेश रमेश मोरे, नरेश प्रधान बागडे, मोनिका विजय चौधरी, डाँ. शरीफ शेख बागवान, राजेश संतोष ठाकूर, संजय रघुनाथ बाविस्कर, प्रियता पूना कंखरे, आकाश अशोक धनगर, राजश्री उमेश नेवे, विजया रघुनाथ पांडे, रुपाली सुधीर ठाकूर, सैय्यद जुलफिकार हसन रियाज हसन, रंजना माधवराव मराठे, विनोद बाबुलाल सपकाळे, सचिन विठ्ठलराव राऊत, अलफैज पटेल, संतोष डीगंबर ढीवरे, विकास अरुण रणधीर, सुनील अमृत गोपाळ, बी. जी. गायकवाड, सुनील देविदास नारखेडे, संदीप मधुसूदन पाटील, विजय शंकर सूर्यवंशी, डाँ. हेमंत भानुदास जाधव, भावेश भरत अमृते, अशोक दिगंबर जाधव, डाँ. विजय काशिनाथ पाटील, जयश्री योगेश सोनवणे, मनीषा प्रवीण पाटील, गुणवंतराव शिवदास पाटील, भास्कर रामराव महाजन, शरद भगवान पाटील