<
जळगाव : प्रथम वर्ग न्यायाधिश श्री.कांबळे यांनी दोन वेगवेगळ्या विषयामध्ये सतीश कांतीलाल पुरोहित, चंद्रशेर प्रभाकर कासारच्या विरोधात पकड वारंट मंजूर केले आहे. फिर्यादी विशाल चढ्ढा यांनी फिर्याद क्र. ३०४१/२०१७ च्या स्वरूपात भा.द.वी. ५००,५०१च्या रूपात सतीश कांतीलाल पुरोहित, विकास मणिलाल सिंह परिहार, चंद्रशेखर प्रभाकर कासार, दिपाली दीपक भदाणेच्या विरोधात तक्रार केली होती. या विषयी दोषारोपासाठी १५ फेब्रुवारी निश्चित आली होती. परंतु १५फेब्रुवारीला सतीश कांतीलाल पुरोहित व चंद्रशेखर प्रभाकर कासार गैरहजर होते. यासाठी प्रथम वर्ग न्यायाधिश श्री.कांबळे यांनी फिर्यादीचा अर्ज मंजूर करण्याबरोबर पकड वारंट काढले. त्याचप्रमाणे अजून एका विषयामध्ये फिर्याद क्र. ५०५०/२०१७ भा.दं.वी.५००,५०१च्या रूपात फिर्यादी मोनिका चढ्ढा यांच्या अर्जावर आरोपी सतीश कांतीलाल पुरोहितच्या विरोधात १५ फेब्रुवारीला पकड वारंट मंजूर केले आहे. दोन्ही विषयामध्ये मंगळवारी २५ फेब्रुवारीला आरोपी सतीश कांतीलाल पुरोहित, चंद्रशेखर प्रभाकर कासार यांनी प्रथम वर्ग न्यायाधिश कांबळे यांच्यासमोर उपस्थित असताना प्रत्येकांनी शंभर-शंभर रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र त्यांनी दंडाची रक्कम भरल्यामुळे पकड वारंट रद्द करण्यात आले. सतीश पुरोहित, चंद्रशेखरच्या विरोधात पकड वारंट काढल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.