<
भारत हा विविध संस्कृती, संस्कार आणि पारंपरिक पद्धतीने नटलेला सजलेला देश होता.आता तो विविध स्मार्ट मार्केटींग,डिजिटल टेक्नॉलॉजी आणि हार्डवेअर सोफ्टवेअर एम बी,जि बी,मेमरी कार्ड मध्ये सामावलेला आहे.विविध प्रकारचे साहित्य एकाच सहा माळ्याच्या मॉल मध्ये मान्यताप्राप्त कंपनीचे चांगल्या प्रतीचे विश्ववासनीय उत्पादन उपलब्ध आहे.त्यांची निवड करण्यासाठी आपल्या त्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.तरच ते तुम्ही खरेदी करून रीतसर जी एस टी, टॅक्स भरून घरी घेऊन जाऊ शकता. ही सुविधा देशातील प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. त्यात कॅश, डिबीट, क्रेडिट पेटीएम सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. असाच एक उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी शहरात राहणाऱ्या लोकांसाठी पती पत्नी विक्री केंद्र म्हणजेच वधु वर सुचक नांव नोंदणी केंद्र निर्माण झाली आहेत.त्या केंद्रांच्या वतीने दर आठवडा, महिनाला मेळावा आयोजित करण्यात येत असतो. त्यात मना जोगी पती,पत्नी निवडण्यासाठी माहिती अर्ज उपलब्ध करून दिल्या जातात. उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे सुरक्षित ठिकाणी राहणारे नेहमी स्वतःला समाजा पासुन वेगळे समजतात.त्यामुळेच त्यांना त्यांच्या लायकीचा मुलगा,मुलगी अपेक्षित असते. त्यांच्या योग्यतेची नातलगांतील मुलगा किंवा मुलगी नसते.शिक्षण, नोकरी आणि आर्थिक परिस्थिती. गावं सोडून शहरात आलेला लोकांना शिक्षणामुळे नोकरी मिळते, नोकरीमुळे आर्थिक प्रगती झालेली असते.गावांतील नातलग शेतकरी असला तरी त्यांच्या शेतीचा सातबारा नोकरी करणाऱ्यांना शून्य किंमतीचा वाटतो,त्यांची एस सी सी,एच एस सी झालेली मुलगी गावठीच वाटते. म्हणूनच ते मुलगा मुलगी वधु वर सूचक केंद्रात शोधतात.त्यातुन अनेक लक्षवेधी घटना समोर येत आहेत. त्यांचा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळे अनेक उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गाच्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न एक गंभीर समस्या झाली असते.त्यांच्या मुलींमुलाच्या सुरवातीला असलेल्या अपेक्षा वय झाल्या नंतर कमी कमी होत जातात. वय झाल्यामुळे मग ते कोणत्याही वयाच्या व परिस्थितीच्या मुलामुलीं सोबत लग्नासाठी तयार होतात.त्यासाठी शहरातील मल्टिनॅशनल मॉल सारखे आता पती पत्नी विक्री केंद्र , जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम, मॅरेज डॉट कॉम,वृत्तवाहिन्या डॉट कॉम निघाल्या आहेत.त्याला वधु वर सूचक की पती पत्नी विक्री केंद्र म्हटल्या जाते.ट्रेंड युनियनचे काम करीत असल्यामुळे, वेगवेगळे कामगार,कर्मचारी अधिकारी भेटतात. सामाजिक कार्य करीत असल्यामुळे समाजात वावरत आल्यामुळे लोक त्यांच्या मुलामुलींच्या समस्या वडीलधारी किंवा कामगार नेता म्हणून सांगतात. एकाच वेळी तीनचार ठिकाणी नांव नोंदणी करून ही मनासारखे स्थळ मिळत नाही असे म्हणतात. गांव सोडून सर्व नातलगांना सोडून मुलगा,मुलगी ओळख ना पालक नसलेल्या पती पत्नी विक्री केंद्रात शोधावी लागते. शहरात रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड,रिक्षा स्टँड वर होडिंग,पोस्टर लावलेली असतात.त्यावर लिहलेले असते, तीन हजार मुलामुलींच्या नोंदणीकृत केंद्रातून मनपसंत पती पत्नी निवडण्याची सुवर्ण संधी.सध्या जमाना डिजिटल स्मार्ट जाहिरात बाजीचा असल्यामुळे लोक मोठया प्रमाणात आकर्षित होतात.त्यामुळे सकाळ, संध्याकाळी लोकांची फाईल बघण्यासाठी गर्दी असते. बसायला जागा नसल्यामुळे लोक लाईन मध्ये अर्धा एक तास उभे राहतात.त्यामुळेच केंद्र प्रमुखांनी गेटवर एक मोठा नोटीस बोर्ड लावला असतो त्यावर नियम व अटी लागु लिहले असते.मुलांची माहिती असलेली फाईल एकच वेळ पाहता येईल त्यासाठी मुलीचे आधार कार्डाची नोंद करावी लागेल. त्यासाठी सहा विभाग केले आहेत.प्रत्येक विभागात मुलांची वेगवेगळी माहीत दिली आहे. सहा विभागातील कोणताही एक मुलगा पती म्हणून एकदाच निवडता येईल. एका वेळी एकाच विभागातील फाईल पाहता येईल,पुढे जाता येईल पण मागे येता येणार नाही.म्हणूनच लोकांची मानसिकता माहिती असल्यामुळे केंद्र प्रमुखांनी प्रवेशद्वारावर मुलांची माहिती ठळक पणे लिहली असते.आईवडील मुलगा पाहून जातात पण मुलगी पसंत करीत नाही,म्हणून मुलींनेच प्रथम मुलगा पहावा,म्हणून बहुसंख्य मुलीच प्रथम मुलांची फाईल पाहण्यासाठी म्हणजे पती खरेदीसाठी येतात.वधु वर सूचक नाही, पती पत्नी विक्री केंद्र आहे. त्यामुळे केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांनी अनुभवाने नोंदी ठेवल्या आहेत.विभाग पहिला इथे चांगल्या नोकरीवाला व इमानदारीने वागणारा मुलगा पती म्हणून मिळेल.यात बाराशे नांवे उपलब्ध आहेत.मुलगी वाचते आणि पुढे जाते.विभाग दुसरा इथे चांगल्या नोकरीवाला व इमानदारीने वागणारा,मुलांना विशेष प्रेम करणारा मुलगा पती म्हणून मिळेल, यात आठशे तीस नांवे उपलब्ध आहेत.मुलगी वाचते आणि पुढे जाते.विभाग तिसरा इथे चांगल्या नोकरीवाला व इमानदारीने वागणारा,सुंदर देखणा मुलगा पती म्हणून मिळेल, यात पांचशे बावीस नांवे उपलब्ध आहेत.मुलगी वाचते थोडा वेळ विचार करून थांबते आणि पुढे जाते.विभाग चौथा इथे चांगल्या नोकरीवाला व इमानदारीने वागणारा,सुंदर देखणा आणि घरात काम करण्याची आवड असणारा पती म्हणून मिळेल, यात तीनशे बेचाळीस नांवे उपलब्ध आहेत.मुलगी वाचते थोडा वेळ विचार करून थांबते,काय ?.असे मुलंही अजून या दुनियेत आहेत?. फाईल ला उघडण्यासाठी हात लावते.पण आणखी चांगलं पुढच्या विभागात असेल म्हणून पुढे जाते.विभाग पांचवा इथे चांगल्या नोकरीवाला व इमानदारीने वागणारा,सुंदर देखणा,घरात कामाची आवड असणारा,आपल्या पत्नीवर जीवपार प्रेम करणारा मुलगा पती म्हणून मिळेल, यात तीनशे सतरा नांवे उपलब्ध आहेत.मुलगी वाचते थोडा वेळ विचार करून थांबते. आणखी चांगलं पुढच्या विभागात असेल म्हणून पुढे जाते. आणि पुढे जाते. विभाग सहावा शेवटचा तिथे थोडा मोठा बोर्ड असतो त्यावर लिहलेले असते.या विभागाला आपण भेट देणाऱ्या ३३३९ व्या तरुण तडफदार सुंदर तरुणी आहेत. हया विभागात कोणताही मुलगा पती म्हणून मिळणार नाही. परंतु सरकार मान्यताप्राप्त असण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मुलींना योग्य वयात पती का मिळत नाही. हे सिद्ध करण्यासाठी आणि ज्यांचे वय झाल्यावर लग्न झाले ते का टिकत नाही यांचे कारण त्यांना संतुष्ट करणे अशक्य आहे.हे दाखविण्यासाठी होतो.यांचा एकूण अभ्यास केला तर सर्व समाजातील मुली,मुलांची इच्छा अजून चांगला,अजून चांगला ही असल्यामुळे लग्नाचे योग्य वय निघून जाते.त्यांची शिक्षा सर्व कुटुंबातील सदस्यांना भोगावी लागते,त्यामुळे कुटुंबाचे मानसिक,शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठे न भरून येणारे नुकसान होते. म्हणूनच समाज व नातलगांना सोडून अलिप्त राहू नये. त्यांचे वाईट परिणाम सर्व समाजावर होतात.त्यामुळेच वधु वर सूचक नाही, पती पत्नी विक्री केंद्र जोरात चालतात.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई,