<
समाजातील प्रश्न, आसपासचं वातावरण यामुळे लेखक लिहिता होतो, लेखकाचं अस्वस्थ होणं हेच समाजाची स्थिती दर्शवणार असल्याचा सूर चर्चासत्रात होता.
परिवर्तन आयोजित ‘भावांजली परिवर्तन कला महोत्सवा’त सहाव्या दिवशी ‘मी का लिहितो?’ याविषयावर चर्चासत्रात डॉ. भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, अजय कांडर, अशोक कोतवाल, शंभू पाटील व रफिक सुरज यांनी सहभाग घेतला.
डॉ भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात, मी लिहितो कश्या करता त्यापेक्षा मी का छापतो मी का लिहतो त्यात सगळ्यात चांगले ग्रंथ मौखिक च आहेत त्यामुळे जंगलं वाचली कारण रोज चार एकर जंगल कमी होते आहे मनातलं कॉम्लेक्स कमी होण्यासाठी भाषेमुळे माणसांचे मेंदु वाढले. कोसला मौखिक व्हावी म्हणून मी लिहतो असं मत त्यांनी मांडले. या प्रसंगी कवी अजय कांडर यांनी मी मनोरंजनासाठी कधीही लिहित नाही तर आसपासच्या व्यथेतून लिहितो, अजूनही मी चांगली कविता कधी लिहिली नाही चांगली कविता लिहिता यावी म्हणून मी लिहित असतो. माणसाचं व्यापारीकरण हे वाइट असतं, हे चक्र वाईट आहे, म्हणून लेखकाला लिहावसं वाटतं. बदलत्या काळानुसार प्रश्न बदलत आहेत. समाज सोडून जगता येत नाही, लेखकाला जग उघड्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. जगातली प्रत्येक बाई ही बुद्धाजवळ जाते. कारण दु:ख हे तिच्याजवळ जास्त असते, तिच माझ्या लेखनाची प्रेरणा आहे म्हणून मी लिहितो असं मत कवी अजय कांडर यांनी मांडले.
यानंतर साहित्यिक रफिक सुरज यांनी ,’मराठी जगतो ,माझी भाषा मराठी माझ्या वडिलांनी माझी भाषा मराठी लिहली आहे एक प्रकारची अस्वस्थता माझा समोर आहे म्हणून मी लिहतोय, माझे बालपण खेड्यापाड्यात गेलं जातीय भेद कधीही वाट्याला आली नाही. शिरखुरमा आधी गल्लीत वाटला जायचा कधीही धार्मीक तेढ आमच्या गावात नाही. मी मराठी चांगले। बोलतो म्हणजे काय हे कौतूक त्यातला गर्भित अर्थ छळतो मी भारतीय आहे हे मला सिध्द करावं लागतं हे जगणं माझ्या वाट्याला येते हि सगळी अस्वस्थता “तुम्ही मला बोलु दिले नाही ,तुम्ही मला ऐकु दिलं नाही याची तक्रार मी केली नाही सर्व गोष्टी तुमच्या मनासारखे केले मी सतत तुमचा धाक घेवुन जगत आलोय “निक्षून हि कविता सादर केली म्हणून मी लिहतो अस्वस्थता मांडतोय अशोक कोतवाल यांनी, मी लिहतोय हा मला जडलेला रोग आहे यावर कुठलेही औषध नाही अनेक लोक माझ्या शेजारी आहेत कुठलाच विचार नाही आरामात जगतात ,झोपतात ,फिरतात, परंतु मी माझ्या आजुबाजुला जे जे घडते त्याचा विचार करत बसतो “माझा भोवताल मला चिमटा घेतो :”नुसताच गलबला या कवीता संग्रहातली ओळीने मी अस्वस्थ होतो कधी ती फार काळ टिकते कधी लगेच निघुन जाते जेव्हा अस्वस्थता जेंव्हा उंचावर पोहचते तेव्हा तीची कविता होते. जेव्हा एखादी घटना माझ्या मनावर खोलवर परिणाम करते मग ओळी जन्माला येतात प्रतेक ओळीला रुप देता येईल असे काही नाही माझ्या मानसिकतेतला अनेक घुसमटत ही समुहाच प्रतिनिधीत्व करते. चांगला कवी नेहमी चांगली कविता शोधत असतो.
जगण्याचा पातळीवर पिचवटलेला सामान्य माणूस माझ्या कवितेचा आत्मा आहे त्याचं जगणं आणि त्याचा संघर्ष माझ्या लेखनात येतो कधी कधी कवितेत ते सामवता येत नाही म्हणून मी ललित लेख मी लिहितो जागतिकीकरणाच्या काळात शोषणाचा पध्दती तसेच शोषणाची व्यवस्था हे प्रश्नचिन्ह आहे.
जगण्याचा पातळीवर पिचवटलेला सामान्य माणूस माझ्या कवितेचा आत्मा आहे त्याचं जगणं आणि त्याचा संघर्ष माझ्या लेखनात येतो कधी कधी कवितेत ते सामवता येत नाही म्हणून मी ललित लेख मी लिहितो जागतिकीकरणाच्या काळात शोषणाचा पध्दती तसेच शोषणाची व्यवस्था हे सगळं पकडण्याचा प्रयत्न मी करत असतो कुठल्याही काळात शोषणाची व्यवस्था अस्तित्वात आहे हि जाणीव लेखक, कवि करुन देत असतो त्या व्यवस्थेवर हल्ला बोल कवि करत असतो सुरवातीचा काळात जेव्हढ सुरक्षित मला तिनदशकात वाटलं परंतु अलिकडच्या पाच दहा वर्षांत असुरक्षित वाटायला लागला राजसत्ता व धर्मसत्ता जेव्हा हातात घेऊन चालते तेव्हा असुरक्षित वाटायला लागते म्हणून कवि लेखक लिहु लागतो बोलु लागतो
शंभु पाटील यांनी याप्रसंगी, “मी का लिहतो , मी कशाला लिहतो यात मला घेतले पाहिजे लहान पणापासुन तुकाराम ते नेमाडे दादा सोशल मिडीयावर दोन प्रजाती एक फोटो टाकणारे व कविता लिहणारे असे पंथ निर्माण झाले आहेत तेंडुलकर, एलकुंचवार ,आळेकर ,दत्ता पाटील हे नाटकार सत्ता कळली नाही पुरुषांना बायकांची मन कळत नाही स्वातंत्र्य महत्वाच्या आपल्याला दुसर्याचे स्वातंत्र्य मान्य नाही”
जेष्ठ कथाकार मेघना पेठे यांनी रफिक सुरज चे आभार , त्याला मुसलमान असण्याची अस्मिता विसरून माणुस म्हणून स्विकारलं पाहीजे, मला बाई का म्हणतात? मला बाईची अस्मिता पुसयची आहे . प्रतेक माणुस वेगळा आहे. त्यातलं वेगळेपण जातीय व्यवस्थेचा फळ्या टाकलेला असतात . त्यापेक्षा मी भारतीय आहे तेवढे पुरे आहे मी का लिहतो जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो ,जगणे सुरु झाले जेव्हा काहीच नव्हतं म्हणजे शाहीचा शोध लागला नाही ,अजुन मागे गेलो म्हणजे प्राण्यांपेक्षा वर आला तेव्हा हळु हळु माणसांला जगणं कळायला लागलं तेव्हा माणुस अस्वस्थ व्हायला लागला वितभर आयुष्य समजायला लागलं तेव्हा तो अस्वस्थ व्हायला लागलो सत्ता आणि संपत्ती यातला संशय सुरु झाला तेव्हा बाई घरात असायला लागली म्हणजे पुरुषांनी नियम तयार करायला सुरुवात झाली बाई पुरुष यांची निकष लावायला सुरुवात झाली आई म्हणजे समजशील सहनशील परंतु आपण विसरतो तिला ही स्वांतत्र्य आहे हेच विसरतो आपण त्या झाडांचा पत्या सारखे आहोत जे गळुन पडतात आणि वारा आला की उडुन जातात मी स्वार्थी पणाने लिहते कारण मला जाणुन घ्यायची असते मला जे सांगायचं असतं ते मी लिहते वेगळ्या प्रेरणा आपल्यास मिळत राहतो.
कार्यक्रमाला सुशील नवाल, पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे, रविंद्र जाधव हे प्रमुख पाहूणे होते. कार्यक्रमाला कवी संजय चौधरी अनिसभाई शहा , नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, नारायण बाविस्कर आदी उपस्थित होते. महोत्सव प्रमुख अनीलभाई कांकरिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
उद्या मराठी भाषा दिनानिमित्त ‘जातस्य हि’ हा कवितेचा कार्यक्रम व जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांचा कार्यक्रम सादर होईल.