<
जळगाव(प्रतिनिधी): आज राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे महत्व समजावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण व्हावा म्हणून प्रगती विद्यामंदिर व प्रगती माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षक मनोज भालेराव व भाग्यश्री तळेले यांनी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन व नियोजन केले.यात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ही करण्यात आले होते.त्यात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक साहित्य,प्रतिकृति,छोटे प्रयोग,इ बनवले होते व त्यांचे प्रदर्शन मांडले होते. तसेच विविध विज्ञानाशी संबंधित रांगोळ्या काढल्या होत्या. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शोभा फेगडे तसेच प्रमुख अतिथि म्हणून मुख्याध्यापिका मनीषा पाटिल व ज्योती कुलकर्णी या होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाग्यश्री तळेले,प्रस्ताविक व आभार मनोज भालेराव तर विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्व त्यांच्या मनोगतातून विषद केले.तसेच अलका करणकर यांनी विज्ञानाचे महत्व सांगितले.अविदिप पवार यांनी विज्ञानाची ओवी गायन करुन गती विषयक नियम सांगितले.