<
जळगाव दि.२८ – के सी ई चे आय एम आर मध्ये 21 व्या आय टी स्पर्धांना सुरवात झाली. व्यासपीठावर के सी ई व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. हर्षवर्धन जावळे तसेच के सी ई इंजिनियरिंग कॉलेजचे अॅकॅडीमीक डीन प्रा.संजय दहाड, जळगाव जनता बॅंकेचे आय टी सिस्टीम हेड अतुल नाईक आणि आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना डॉ हर्षवर्धन जावळे यांनी स्पर्धेसाठी उपस्थिती विविध महाविद्यालयातील टेक्नोसॅव्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. प्रा संजय दहाड यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नवीन शाखांची माहीती देतांना योग्य वेळी योग्य गोष्टी योग्य त्या संसाधनांच्या साह्याने करण्याचा सल्ला दिला.. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील पथदर्शक होऊ शकतात असे दहाड यांनी सांगितले. त्यानंतर अतुल नाईक यांनी टेक्नॉलॉजी आणि बॅकींग क्षेत्रातील सुसंबद्ध, सुसंगत पध्दतीचा अवलंब करुन करीयरमध्ये पुढे जाण्याचा सल्ला दिला. यानंतर आय एम आरच्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्या म्हणाल्या, टेक्नॉलॉजी ही आजच्या काळाचा की आहे त्याचा उपयोग करतांना स्काय ईज द लिमिट हे लक्षात घेऊन तुमचे आकाश विस्तारा.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली नारखेडे सरोदे यांनी केले. सुत्रसंचलन शुभांगी परदेशी आणि संजना संचेती या विद्यार्थिनींनी केले.
या स्पर्धेअंतर्गत आज विद्यापिठ स्तरावरील आय टी क्वीझ, वेबसाईट डेव्हलपमेंट, तर उद्या सी सी पी पी प्रोग्रामिंग आणि गेमिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 240 विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन विश्वेश्वरी आणि प्रसाद नेवे, डायरेक्ट साॅफ्टटॅनीक प्रा ली. हे उपस्थीत होते. कारेक्रमासाठी विभागप्रमुख तनुजा फेगडे,डॉ वर्षा पाठक, उदय चतुर, श्वेता रमाणी, अंकिता तिवारी, श्वेता फेगडे, दिपाली किरंगे, प्रमोद धोगरे, एस एन खान यांचे विषेश सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार राकेश राणे यांनी मानले. आणि उद्याच्या कार्यक्रमाला आणि स्पर्धांना जास्तीत जास्त विद्यार्थीनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन समन्वयक राकेश राणे आणि रूपाली नारखेडे यांनी केले आहे.