<
मुंबई : – दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. तर माटुंगा, चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊ सबरसत आहे. तसंच येत्या दोन तासांमध्ये मुंबई- ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. भिंवडीतही गेल्या काही तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नवी मुंबईतही पहाटेपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळं रस्त्यांवर सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडी होण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे.