<
खडके बु ता एरंडोल-(प्रतिनीधी) – येथिल खडके बु ,व वरखेडी शिवारात दि,२६/०२/२०२०रोजी रात्रीच्या वेळी खडके बु येथील दै, पुण्यनगरी चे पत्रकार श्री अतुल पाटील हे जळगांव येथुन आपल्या गावी परत येत असतांना रात्री ८:३० वाजता खडके फाट्या जवळ त्यांना बिबट्या समोर दिसल्याने ते भयभीत होऊन घाबरून परत थोड्या अंतरावर मागे जाऊन आपला जीव मुठीत घेऊन परतले व नंतर आपल्या गावात येउन घडलेला प्रकार त्यांनी गावकर्यांना सांगितल्यावर रात्री च्या वेळी लोडशेडिंग असल्याने शेतात भरणा करण्यासाठी जाणारे शेतकरी देखील घाबरून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दि,२८/०२/२०२०रोजी देखील वरखेडी येथील शेतकरी श्री अनिल प्रभाकर पाटील यांच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने वरखेडी चे शेतकरी रात्री शेतात पाणी भरणा करण्यासाठी गेल्यावर शेतात त्यांनी एकमेकांना बॅटरी चमकवत व आरोळ्या दिल्याने जवळ बोलावून घेतले व आपला जीव वाचवण्यात त्यांना यश आले. तसेच खडके बु व वरखेडी परिसरातील रब्बी हंगाम जोरात असल्याने शेतकऱ्यांना रात्री च शेतात पाणी भरणा करण्यासाठी जावे लागत आहे, तसेच शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वन विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्या चा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून एकही शेकऱ्याचा जीव धोक्यात येणार नाही अशी खंत परिसरातील शेतकरी वनविभाग यांच्याकडे करीत आहे.