<
उत्राण ता एरंडोल-(प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळयेत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच कार्यक्रमाच्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी कॅमप्युटर रूम चे उदघाटन उद्योगक भागवत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल पं स सभापती शांताबाई रोकडे,उपसभापती अनिल महाजन,कासोदा पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक रवींद्र जाधव,गट शिक्षण अधिकारी विश्वास पाटील,केंद्र प्रमुख सुनील महाजन,मोहन केदारे सोलापूरकर,सरपंच कौशल्या अहिरे,उप सरपंच राजू पाटील,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुळशीराम धनगर,राजू अहिरे,हरून भैया देशमुख,कैलास कोळी,धनराज पाटील,शोभा तिवारी आशा भिल,खलील शेख,दीपक महाजन,अजय बियाणी,विलास महाजन,पोलीस पाटील प्रदीप तिवारी, सर्व पत्रकार व ग्राम पंचायत चे सर्व सदस्य,शाळेतील विद्यार्थ्यांच्या पहिला वार्षिक स्नेह संमेलन असल्यामुळे लहान मुलांच्या मानाने चांगल्या पद्धतीने नृत्य गायन नाटिका सादर केले, विशेष कौतुक शिक्षकांचे करण्यात आले,कुठलाही बाहेरील प्रशिक्षक न आणता ,चांगल्या पद्धतीने सर्वांनी मिळून मेहनत घेतली ,सूत्र संचालन सोनवणे सर, आभार अनिल पाटील सर यांनी मानले,शाळेतील शिक्षक नितीन पाटील सर,वानखेडे सर,मुख्याध्यापक अनिल पाटील,राजश्री ढोले,सुजाता अत्तरदे,राजु पाटील सर,सर्व उपस्थित होते.